“Thick smoke rises from crash site as Air India passenger plane crashes in Ahmedabad’s Meghani Nagar area.” Saam TV
देश विदेश

Plane Crash: २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; अहमदाबादमधील थरकाप उडवणारा व्हिडिओ

Ahmedabad Airport Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Gujrat Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील मेघाणी नगर या रहिवासी भागात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली. विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच हे विमान कोसळल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरात जोरदार स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट दिसले. स्थानिक नागरिकांनीही याला दुजोरा दिला आहे. अपघातस्थळी तात्काळ अग्निशमन दल, पोलीस, आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. अनेक जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. एअर इंडियाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. प्रशासनाने परिसर सील केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण अहमदाबाद शहरात शोककळा पसरली आहे. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जाला आहे.

अहमदाबादमधील मेघाणी नगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळलं. परिसरात मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. जिकडे तिकडे धुराचे लोट दिसत होते. धुरामुळे परिसरात घाबरलेलं वातावरण निर्माण झालं. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखळ झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक पोलिस आणि बचावकर्मी घटनास्थळी आहेत. या अपघाताचा तपास आणि कारणांचा शोध घेण्यात येत आहे.

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील मेघानी नगर या रहिवासी भागात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने खळबळ उडाली. टेकऑफच्या काही मिनिटांतच झालेल्या या दुर्घटनेत विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. दुर्घटनेनंतर घटनास्थळी काळ्या धुराचा लोट पसरला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आकाशात धुराचा लोट दिसू लागला. मेघानी नगरातील रहिवासी भागात ही घटना घडल्याने स्थानिकांना मोठा धक्का बसला. घटनास्थळी तातडीने बचाव पथकाच्या गाड्यागाड्या आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या. बचावकार्य सुरू असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मात्र, अद्याप मृताची नेमकी संख्या समजू शकलेली नाही.

एअर इंडियाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून, विमान कोसळण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासनाने परिसर सील केला असून, रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. या घटनेने अहमदाबाद शहरात शोककळा पसरली असून, बचावकार्य आणि चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT