Murlidhar Mohol Ahmedabad Air India Plane Crash Saam TV NEws
देश विदेश

Ahmedabad Plane Crash: दोन्ही इंजिन एकाचवेळी बंद, एअर इंडिया विमान अपघातामागे मोठ्या कटाची शक्यता? केंद्रीय मंत्र्यांना वेगळाच संशय

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासाची सुरूवात झाली आहे. इंजिन बिघाड, इंधन पुरवठा आणि अन्य शक्यता तपासल्या जात आहेत. ब्लॅक बॉक्स सापडला आहे आणि तपास सुरु आहे.

Bhagyashree Kamble

महिन्याच्या सुरूवातीलाच अहमदाबादमधील एअर इंडिया विमानाच्या अपघातामुळे संपूर्ण देश हादरला. या अपघाताचे मुख्य कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, या घटनेचा संपूर्ण तपास सुरू आहे. केंद्र सरकारकडून या तपासासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले. या पथकाकडून विमानाच्या तोडफोडीचा संशयही तपासला जात आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधीत माहिती दिली. एएआयबी (एअर इंडिया विमान अपघात) बाबत तोडफोडीच्या शक्यतेचीही तपासणी सुरू असल्याचे ते म्हणाले.

एका वृत्तसंस्थेशी बातचीत करताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनेचा सर्व बाजूने तपास सुरू आहे. यामध्ये विमानाच्या नुकसानाच्या बाजूनेही तपास केला जातोय. पथकाकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचे दोन्ही इंजिन एकाचवेळी बंद पडले. एकाचवेळी इंजिन बंद पडणं फार दुर्मिळ घटना आहे. अशा घटना फार घडत नाही', असं मोहोळ म्हणाले.

ब्लॅक बॉक्सबाबत मुरलीधार मोहोळ म्हणाले, 'अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. यात कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डरचा समावेश आहे. या बॉक्समध्ये विमानाची सर्व माहिती असते. यामुळे विमान अपघाताची कारणं समजून घेण्यास मदत होते', असं मोहोळांनी स्पष्ट केलं.

तसेच 'अपघाताचं मुख्य कारण तपास अहवाल समोर आल्यानंतर समजेल. इंजिनीत बिघाड की इंधन पुरवठा होत असताना समस्या निर्माण झाली, की या अपघातामागे आणखी कोणतं कारण आहे? हे तपासातून समोर येईल. या विमान अपघाताचा तपास अहवाल येत्या तीन महिन्यांत समोर येईल', असं मोहोळ यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT