Ahmedabad Plane crash update  Saam tv
देश विदेश

Ahmedabad Plane crash : मी २ कोटी रुपये देते, मला माझे वडील परत द्या; विमान अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीच्या मुलीचा आक्रोश

Ahmedabad Plane crash update : विमान अपघातात शेकडो लोकांनी त्यांच्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. एका महिलेने तिच्या वडिलांना अपघातात गमावलं. त्यावरून या महिलेने एअर इंडियावर आक्रोश व्यक्त केला.

Vishal Gangurde

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. या अपघातात कोणी बहीण, कोणी बाप तर कोणी मुलगा गमावला आहे. भीषण अपघातात विमानातील एक व्यक्ती सोडला तर २४१ लोकांचा मृत्यू झाला. या विमान अपघातात प्रवाशांचा जळून कोळसा झाला आहे. या अपघाताने देशभरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर एयर इंडियाने मृतांच्या नातेवाईकांना १ कोटींची घोषणा केली. परंतु आम्हाला एक कोटी रुपये नको. मी तुम्हाला २ कोटी रुपये देते, मला माझे वडील परत द्या, असं म्हणत एका महिलेने आक्रोश व्यक्त केला.

वडील गमावलेल्या एका महिलेने 'आज तक' या वृत्त वाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी या महिलेने आक्रोश व्यक्त केला. 'मला एक कोटी रुपये देत आहेत. तर मी तुम्हाला दोन कोटी रुपये देते. पण माझे वडील मला परत द्या, असे या महिलेने म्हटलं. फाल्गुनी असे महिलेचं नाव आहे.

फाल्गुनी म्हणाल्या, 'माझ्या वडिलांची काय चूक होती? मी त्यांची मुलगी आहे. मला माझे वडील परत करा. एअर इंडिया काय मस्करी करत आहे. कोणतंही उत्तर नाही. त्यांना कोणत्यातही संवेदना नाहीत'.

फाल्गुनी रडत रडत पुढे म्हणाल्या की, 'एअर इंडियाने एक कोटी देण्याची घोषणा केली. मी दोन कोटी देते. परंतु माझे वडील मला परत द्या. पैशांनी माणसाला विकत घेता येते का? आम्ही त्या पैशांनी पलंग खरेदी करू. पण त्यावर झोप कशी येईल?'.

'माझ्या वडिलांकडून मला खरं प्रेम मिळालं, ते आता कुठून मिळेल? माझे वडील देशभक्त होते. त्यांना एअर इंडियाने प्रवास करायला आवडायचं. त्यांना एअर इंडियाविषयी अभिमान वाटायचा. माझ्या वडिलांना देश प्रेमाचं बक्षीस मिळालं का? सुरक्षित प्रवासाची सेवा देता येत नसेल. तर एअर इंडिया बंद करा. कोणाच्या जीवापेक्षा काही मोठं नाही,असं त्या पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Price : कांद्याला तीन हजार रुपयांचा दर मिळावा; ग्रामसभेत एकमताने ठराव

Girija Oak: शाहरुखसोबत काम केलेल्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

Sydney Sweeney: बॉलिवुडकडून ५३० कोटींची ऑफर, प्रियंका- कतरिनाला मागे टाकणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

देवाची पुजा करताना मनात चुकीचे-घाणेरडे विचार येत असतील तर हे उपाय करा

Panhala Fort History: पन्हाळ्याचे थंडगार हवामान आणि रमणीय नैसर्गिक सौंदर्य, जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT