Air India Flight Bomb Threat 
देश विदेश

Air India Flight Threat: एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

Air India Flight Bomb Threat: एअर इंडियाच्या AI114(कंपनीचे बोईंग ड्रीमलायनर 787-8 ) या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. हे विमान 21 जून रोजी बर्मिंगमहून दिल्लीला येत होतं.

Bharat Jadhav

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळत आहे. अहमदाबादमध्ये जाणाऱ्या फ्लाइटच्या दुर्घटनेत काही तरी कटस्थान असल्याचा दावा केला जातोय, त्याच दरम्यान एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी येत असल्यानं खळबळ उडालीय. एअर इंडियाच्या AI114(कंपनीचे बोईंग ड्रीमलायनर 787-8 ) या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. हे विमान 21 जून रोजी बर्मिंगमहून दिल्लीला येत होतं.

रियाधमध्ये सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे उतरवल्यानंतर सुरक्षा तपासणी करण्यात आली. सध्या सर्व प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलीय. एअर इंडियाने याबाबत निवेदन जारी केले आहे. या अनपेक्षित व्यत्ययामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला दिलगीर आहे, कंपनीने म्हटलंय.

प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. एअर इंडियाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या शौचालयाजवळ एक कागद सापडला, ज्यामध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली होती. हे विमान आज सकाळी 11 वाजता दिल्लीत उतरणार होते.

अहमदाबादमधील विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांची सुरक्षा आणि तपासणी वाढवण्यात आलीय. त्यानंतर एअर इंडियाला सतत बॉम्बच्या धमक्यांचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी जयपूर विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. हा धमकीचा संदेश व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आला होता.

13 जून रोजी फुकेत-नवी दिल्ली विमानाला धमकी

एअर इंडियाच्या विमान AI379 लाही बॉम्बची धमकी मिळाली होती. हे विमान थायलंडच्या फुकेतहून नवी दिल्लीला जात होतं. उड्डाणादरम्यान विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती. या विमानात 156 प्रवासी होते. विमानाच्या शौचालयात एक चिठ्ठी आढळली, ज्यावर बॉम्बची धमकी लिहिलेली होती. त्यानंतर वैमानिकाने आपत्कालीन परिस्थितीत अंदमान समुद्रावर प्रदक्षिणा घालत विमानाला फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत उतरवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT