Air India Plane Crash x
देश विदेश

Plane Crash : आगीचा भडका, धुरांचे लोट; ७०० फुटावरुन विमान कोसळले अन् कोळसा झाला, अहमदाबाद अपघाताचे भयावह व्हिडीओ

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये दुपारी विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाचे प्रवासी विमान टेक ऑफनंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये खाली कोसळले. या दुर्घटनेचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (१२ जून) दुपारी मोठी दुर्दैवी घटना घडली. अहमदाबादहून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान AI-171 टेकऑफनंतर अवघ्या दोन मिनिटांत कोसळले. या अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला. विमान जमिनीवर कोसळताच तीव्र स्फोटासह आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाले. आकाशात पसरलेले काळ्या धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिसरात खळबळ उडाली.

१.३८ वाजता विमानाने टेकऑफ केले. १.४० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. अहमदाबाद विमानतळापासून १५ किमी अंतरावर असलेल्या मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले. विमानात एकूण २४२ जण होते, त्यात दोन पायलट १० क्रू मेंबर्स आणि २३० प्रवाशांचा समावेश होता. अपघात झाल्यानंतर लगेच सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ समोर आले होते. विमान हवेतून घसरताना आणि जमिनीवर आदळताच स्फोट होताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले होते.

विमान ज्या ठिकाणी कोसळले, त्या परिसरातील इमारतींना अपघाताचा फटका बसला. इमारतींना भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी, बचावकार्यासाठी एनडीआरएफ, बीएसएफची पथके घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक होते. हे सर्व प्रवासी, क्रू मेंबर्स आणि पायलट यांनी अपघातात जीव गमावल्याची माहिती एपी वृत्तसंस्थेने प्रसारित केली आहे.

विमान कोसळण्यामागील नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आणि सुरक्षा यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादकडे रवाना झाले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपघाताबाबतची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT