Air India AI117 made an emergency landing in the UK after the RAT turbine activated mid-air, passengers safe. saam tv
देश विदेश

Air India Flight Emergency Landing: अनर्थ टळला! हवेतच ऑटोमॅटिक सुरू झालं इमरजन्सी टरबाइन अन्...

Air India Flight Emergency Landing: अमृतसरहून बर्मिंगहॅमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI117 विमानाची हवेतच RAT प्रणाली सक्रिय झाली. त्यानंतर ब्रिटनमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.

Bharat Jadhav

  • एअर इंडियाचं AI117 विमान हवेत असताना RAT सिस्टम ऑटोमॅटिक सुरू झालंय.

  • ब्रिटनमध्ये विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय.

  • सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित असल्याची माहिती आहे.

एअर इंडियाच्या AI117 विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. हे विमान अमृतसरवरून बर्मिंगहॅमला जात होतं. विमान हवेत असतानाच इमरजन्सी टरबाइन सुरू झाल्यानं ब्रिटेनच्या विमानतळावर लँडिंग करण्यात आलं. दरम्यान यात विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर देखील सुरक्षित आहेत. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जेव्हा विमान बर्मिंघमला पोहचणार होते, त्याचवेळी RAT सिस्टम ऑटोमॅटिक सक्रिय झालं .

बर्मिंगहॅमकडे जाण्यापूर्वीच AI117 विमानातील कर्मचाऱ्यांनी RAT तैनात केल्याचे लक्षात घेतले. सर्व इलेक्ट्रिकल आणि हायड्रॉलिक पॅरामीटर्स सामान्य असल्याचे आढळून आले आणि विमान सुरक्षितपणे उतवरलं," असे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटलंय. तांत्रिक तपासणीसाठी विमान ग्राउंड करण्यात आलंय. AI114 (बर्मिंगहॅम ते दिल्ली) परतीचे उड्डाण रद्द करण्यात आलंय. प्रवाशांची झालेल्या गैरसोयीबाबत कंपनी दखल घेतलीय.

रॅम एअर टरबाइन एक आपत्कालीन उपकरण असते. जे विमानामध्ये इंजिन मुख्य वीजेची पूर्तता करणं अयशस्वी झाल्यानंतर हवेच्या शक्तीतून वीज आणि हायड्रॉलिक दबाव तयार केलं जातं. ही प्रणाली सहसा फक्त गंभीर आपत्कालीन परिस्थितीतच सक्रिय केली जाते.

या वर्षी जूनमध्ये अहमदाबाद विमान अपघातादरम्यान त्याच मॉडेलमध्ये (बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर) RAT देखील स्वयंचलितपणे सक्रिय झाले होते. त्या घटनेच्या प्राथमिक तपासात असे आढळून आले की, इंधन पुरवठ्यात व्यत्यय आल्याने इंजिन बंद पडले, ज्यामुळे आपत्कालीन यंत्रणा सुरू झाली होती..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भर मैदानात जोरदार राडा, दोन भारतीय खेळाडू एकमेकांशी भिडले; नेमकं काय घडलं? VIDEO

Nandurbar News: वाहनात पेट्रोल भरत असताना माथेफिरूने पेट्रोल पंपावर आग लावण्याचा धक्कादायक प्रयत्न|VIDEO

Prakash Ambedkar : 'मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण...; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा! गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?

SCROLL FOR NEXT