Bengaluru Crime News
Bengaluru Crime News SAAM T
देश विदेश

Crime News: डेटिंग अॅपवर प्रेम जुळलं, ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या फ्लॅटवर मृत्यू; हवाई सुंदरीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Bengaluru Crime News : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. हवाई सुंदरीचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूप्रकरणात महत्वाची माहिती उघडकीस आली आहे.

हवाई सुंदरी तिच्या प्रियकराच्या फ्लॅटमध्ये होती. त्याचवेळी ही घटना घडली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्रियकरानेच तिची हत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे. (Latest Marathi news)

२८ वर्षीय हवाई सुंदरी अर्चना हिची काही दिवसांपूर्वी डेटिंग अॅपवर (Dating App) सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या आदिशची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर हळूहळू प्रेमात झाले. काही दिवसांनी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

दोघांमधील प्रेमसंबंधांत (Relationship) दुरावा आला होता. त्यानंतर अर्चनाने दुबईहून बेंगळुरूत येऊन प्रेमसंबंध कायमचे संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अर्चना तिचा प्रियकर आदिशच्या बेंगळुरूतील फ्लॅटवर होती. त्याचवेळी तिचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. अर्चनाच्या मृत्यूनंतर आदिशनेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आत्महत्येप्रकरणी नोंद करून तपास सुरू केला होता. मात्र, तपासानंतर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Crime News)

अर्चना ही मूळची धर्मशाला येथील रहिवासी होती. तर आदिश हा केरळचा रहिवासी आहे. दोघांची एका डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. अर्चना आणि माझ्यात वाद झाला होता, त्यानंतर तिचा चौथ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची माहिती आदिशने पोलिसांना सांगितले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना बेंगळुरूत हवाई सुंदरी म्हणून काम करत होती. त्यानंतर ती आंतरराष्ट्रीय कंपनीत हवाई सुंदरी म्हणून नोकरी करू लागली. आदिश आणि तिच्यात नेहमी खटके उडत होते. दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अर्चना ही आदिशच्या फ्लॅटवर आली होती.

अर्चना ज्या ठिकाणावरून खाली पडली, तेथून उडी मारणे इतके सोपे नाही, असे पोलिसांचे म्हणणे असून आदिशला ताब्यात घेतले आहे. दोघेही रिलेशनशिपमध्ये होतो आणि दोघांमध्ये भांडण झाले होते, असे आदिशने चौकशीत सांगितले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT