Ahmedabad Vadodara Expressway Saam Digital
देश विदेश

Ahmedabad Vadodara Expressway : अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Ahmedabad Vadodara Expressway Accident : अहमदाबाद वडोदरा एक्स्प्रेसवे वर नडियादनजीक भीषण उपघात झाला आहे. यात १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे.

Sandeep Gawade

अहमदाबाद वडोदरा एक्स्प्रेसवे वर नडियादनजीक भीषण उपघात झाला आहे. यात १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. वडोदराहून अहमदाबादला जाणाऱ्या भरधाव कारने ट्रॉलरला धडक मागून धडक दिली, त्यामुळेही भीषण दुर्घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच 108 च्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. याशिवाय एक्स्प्रेस हायवे पेट्रोलिंग टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

 गॅस गळतीने सहा घरांना आग; संसार आले उघड्यावर

घरात असलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती होऊन सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे झोपडीला आग (fire) लागल्याची घटना जामनेर तालुक्यातील फत्तेपूरपासून जवळ असलेल्या पिंपळगावपिंप्री गावात (Jalgaon) दुपारच्या सुमारास घडली आहे. यात सहा घरे जळून खाक झाले आहेत. आज जळगाव जिल्ह्यात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत.

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात सकाळी केमिकल फॅक्ट्रीत स्फोट होऊन भीषण आग लागली होती. यामुळे दोन कंपन्यांमध्ये आग लागून यात प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच कंपनीत काम करणारे १७ ते १८ कामगार यात गंभीररीत्या भाजले गेले आहेत. (Fire Brigade) अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यास ३ ते ४ तासांचा कालावधी लागला. कंपनीतील ही आग शमत नाही; तोच जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे सिलेंडरचा स्फोट होऊन झोपडीला आग लागल्याची घटना घडली. 

मालाडमध्ये ८ मजली इमारतीला भीषण आग

मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या एका ८ मजली इमारतीला मंगळवारी (ता.१६) सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. आग लागल्याचं कळताच इमारतीतील नागरिकांनी बाहेर धाव घेतली. मात्र, धुराचे लोळ उठल्याने लहान मुलांसह १४ जणांचा दम घुसमटला. यातील ३ जणांची शुद्ध हरपल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT