Tmc Manifesto 2024: सीएए रद्द करणार, एनआरसी-यूसीसी लागू होऊ देणार नाही; तृणमूलचा जाहीरनामा प्रसिद्ध

Mamata Banerjee News: पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेस (TMC) आणि इंडिया घडीने आज राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjee SAAM TV

TMC Lok Sabha Election Manifesto 2024:

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेस (TMC) आणि इंडिया घडीने आज राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. टीएमसीने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) रद्द करण्याचे आणि देशात समान नागरी संहिता (UCC) लागू होऊन देणार नसल्याचं आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे.

पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले, "जेव्हा टीएमसी इंडिया आघाडीचा भाग म्हणून केंद्रात सरकार स्थापन करेल तेव्हाच आम्ही हे सर्व करू." सीएएआणि यूसीसी व्यतिरिक्त, टीएमसीने घोषणापत्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MNREGA) अंतर्गत दैनिक भत्ता 400 रुपये प्रतिदिन वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

Mamata Banerjee
Sangli Lok Sabha: विशाल पाटील शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेणार? अंबादास दानवे यांचं मोठं वक्तव्य

याशिवाय पक्षाने दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना त्यांच्या दारात रेशन पोहोचवण्याचे आणि 10 मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय टीएमसीने इतर अनेक कल्याणकारी योजनाही जाहीर केल्या आहेत. टीएमसी नेते अमित मित्रा यांनी यावेळी सांगितले की, त्यांचा पक्ष किंमत स्थिरीकरण निधी तयार करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचे वचन देतो.

'दीदी का शपथ' या नावाने प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत, एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि सर्व तरुणांना रोजगार हमी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जाहीरनाम्यात म्हटले आहे की, देशातील सर्व गरीब कुटुंबांना मोफत घरे दिली जातील. सर्व शिधापत्रिकाधारकांना दरमहा पाच किलो धान्य मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.

Mamata Banerjee
Amit Thackeray: त्यांना पंतप्रधान व्हायचंय...., अमित ठाकरेंचा वसंत मोरेंवर निशाणा

दरम्यान, बंगालमधील जागावाटपावरून काँग्रेसशी मतभेद झाल्यानंतर टीएमसी जानेवारीत इंडिया आगाडीतून बाहेर पडली होती. मात्र टीएमसीने म्हटले होते की, ते राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीचा भाग राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com