Amit Thackeray: त्यांना पंतप्रधान व्हायचंय...., अमित ठाकरेंचा वसंत मोरेंवर निशाणा

Pune Loksabha Election 2024: पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरेंवर (Vasant More) टीका केली आहे. याचसोबत यावेळी त्यांनी 'महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईत एकही जागा मिळणार नाही.', असे वक्तव्य केले आहे.
Amit Thackeray On Vasant More
Amit Thackeray On Vasant More Saam Tv

मनसेला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांच्यावर मनसे नेते अमित ठाकरे (MNS Leader Amit Thackeray) यांनी निशाणा साधला आहे. 'वसंत मोरेना पंतप्रधान व्हायचंय. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत.', अशापद्धतीची टीका अमित ठाकरे यांनी केली आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरेंवर (Vasant More) टीका केली आहे. याचसोबत यावेळी त्यांनी 'महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईत एकही जागा मिळणार नाही.', असे वक्तव्य केले आहे.

अमित ठाकरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, '१७ तारखेला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईत एकही जागा मिळणार नाही. त्यांच्याविरोधात वातावरण आहे.' तसंच, 'देशात पुन्हा मोदी सरकार येणार असून ३०० च्या आसपास जागा मिळतील. राज साहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच बिनशर्थ पाठिंब्याचा निर्णय घेतला असेल.', असे मत त्यांनी व्यक्त केले.

Amit Thackeray On Vasant More
Maharashatra Election: मनसेकडून समन्वयकांची यादी जाहीर; पदाधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

अमित ठाकरे यांनी यावेळी मनसेतून बाहेर पडलेल्या वसंत मोरे यांच्यावर टीका केली. 'लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वसंत मोरेना पंतप्रधान व्हायचंय. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत.' अशी टीका करत अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना सल्ला देखील दिला आहे. 'वसंत मोरे यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा. महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे.', असे त्यांनी सांगितले.

Amit Thackeray On Vasant More
Pune Lok Sabha Election 2024: पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी

दरम्यान, अमित ठाकरे आज पुण्यात असून ते सकाळपासूनच मॅरेथॉन बैठका घेत आहेत. मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर अमित ठाकरे पुण्यामध्ये आले आहेत. अमित ठाकरे प्रभागनिहाय बैठका घेत आहेत. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी काम करण्याच्या अमित ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अशातच पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. पुण्यातील मनसे शहर कार्यालयात या नेत्यांची भेट झाली.

Amit Thackeray On Vasant More
Kolhapur Constituency : गोकुळचे संचालक चेतन नरकेंची लाेकसभा निवडणुकीतून माघार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com