Maharashatra Election: मनसेकडून समन्वयकांची यादी जाहीर; पदाधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

Maharashtra Navnirman Sena: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहेत. मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आलीय.
 Maharashtra Navnirman Sena
Maharashtra Navnirman SenaMNS Facebook

(आवेश तांदळे, मुंबई)

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. यापार्श्वभूमीवर मनसेने आज समन्वयकांची यादी जाहीर केलीय. ही यादी जाहीर करताना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्यात.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहेत. मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आलीय. संबंधितांच्या नावांची यादी महायुतीला देण्यात येणार आहे. ही यादी जाहीर करत मनसेने आपल्या पक्षातील नेत्यांना काही सुचना दिल्यात. इतर पक्षातील पदाधिकारी प्रचारात सहभागी होण्यासाठी विचारपूस करत असतील तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी नेमून समन्वयकांशी संपर्क करून द्यावा अशा सुचना देण्यात आलीय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लेाकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केलाय. या पाठिंब्याच्या घेतलेल्या भूमिकेला धरून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी राज ठाकर यांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते व सरचिटणीस यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलीय. कोणत्या मतदारसंघासाठी कोण कोणते समन्वयक आहेत याची यादी खालीलप्रमाणे आहे.

 • पालघर - अविनाश जाधव

 • भिवंडी /कल्याण - आमदार राजू पाटील, अविनाश जाधव

 • ठाणे- अभिजित पानसे

 • ⁠पुणे - अमित राज ठाकरे, राजेंद्र (बाबू) वागस्कर, किशोर शिंदे, बाळा शेडगे

 • नाशिक/दिंडोरी - अभिजित पानसे,किशोर शिंदे,गणेश सातपुते

 • जळगांव / रावेर -अभिजित पानसे

 • शिरूर - राजेंद्र (बाबू) वागस्कर,अजय शिंदे

 • मावळ-नितीन सरदेसाई,रणजित- शिरोळे ,अमेय खोपकर

 • रायगड-नितीन सरदेसाई,संदीप देशपांडे

 • रत्नागिरी / सिंधुदुर्ग - शिरीष सावंत, नितीन सरदेसाई , .अविनाश जाधव

 • शिर्डी / नगर - बाळा नांदगांवकर, संजय चित्रे

 • संभाजीनगर / जालना / धाराशिव / लातूर/ बीड / परभणी / नांदेड / हिंगोली- बाळा नांदगांवकर, संतोष नागरगोजे

 • बुलढाणा / अकोला / अमरावती / वर्धा / यवतमाळ - संदीप देशपांडे

 • बारामती / सोलापूर / माढा - दिलीप धोत्रे, अॅड.सुधीर पाटसकर

 • सांगली / सातारा / कोल्हापूर / हातकणंगले - बाळा नांदगांवकर,अविनाश अभ्यंकर

 • धुळे / नंदुरबार - अभिजित पानसे, अॅड.जयप्रकाश बाविस्कर, अशोक मुर्तडक

 Maharashtra Navnirman Sena
Maharashtra Politics 2024 : नरेंद्र मोदी-राज ठाकरे येणार एकाच मंचावर? शिंदे, फडणवीस, अजितदादांसाठी घेणार सभा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com