Ahmedabad Plane Crash Doctor Family Last Selfie x
देश विदेश

Plane Crash: लंडनला स्थायिक होण्यासाठी डॉक्टर दांपत्य ३ मुलांसह निघाले, विमान टेकऑफ होण्याआधी सेल्फी काढला, पण तोच शेवटचा ठरला

Ahmedabad Plane Crash : एक डॉक्टर दांपत्य त्यांच्या लहान मुलांसह लंडनला स्थायिक होण्यासाठी निघाले होते. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. विमानाने टेकऑफ घेण्यापूर्वी कुटुंबाने सेल्फी काढला होता. हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

Air India Plane Crash: एक डॉक्टर दांपत्य त्यांच्या तीन मुलांसह नव्या आयुष्याचा शुभारंभ करण्यासाठी लंडनला चालले होते. पण पाच जणांच्या सुंदर कुटुंबाचा विमान प्रवास शेवटचा ठरला. लंडनला जाण्यापूर्वी त्यांनी विमानामध्ये सेल्फी काढला होता. विमान अपघातानंतर गोंडस कुटुंबाचा हा शेवटचा सेल्फी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बांसवाडा येथील एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ. कोनी यांनी मागच्या महिन्यात पदाचा राजीनामा दिला होता. डॉ. कोनी, त्यांचे पती डॉ. प्रतीक जोशी आणि त्यांची ३ मुलं लंडनला स्थायिक होण्यासाठी निघाले होते. विमान उड्डाण करण्यापूर्वी पाचही जणांनी एक छानसा सेल्फी काढला होता. सेल्फी काढल्यानंतर काही मिनिटांमध्ये सर्वकाही बदलले.

डॉक्टर दांपत्य, पाच वर्षांची २ जुळी मुलं आणि आठ वर्षाची मुलगी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अहमदाबाद येथे बसले होते. प्रवासी विमानाने उड्डाण केले आणि ३२ सेकंदांनी ते ७०० फुटावरुन खाली पडले. विमानात कॅबिन क्रू, पायलट आणि प्रवासी यांच्यासह २४२ प्रवासी होते. यातील एक प्रवासी बचावला, बाकी सर्वांना जीव गमवावा लागला. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये डॉक्टर दांपत्य आणि त्याच्या मुलांचाही समावेश होता.

'डॉ. जोशी काही महिन्यापूर्वी लंडनला गेले होते. राजस्थानमधील बांसवाडा येथे त्यांचे कुटुंब होते. लंडनला स्थायिक होण्यासाठी ते निघाले होते. दोन दिवसांपूर्वी प्रतीक त्यांची पत्नी आणि मुलांना घेऊन जाण्यासाठी आले होते ते काल लंडन जाणारे विमान पकडण्यासाठी अहमदाबादसाठी निघाले होते', अशी माहिती प्रतीक जोशी यांचे चुलत भाऊ नयन यांनी माध्यमांना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT