Ahmedabad Air India Plane Crash Saam Tv News
देश विदेश

Air India Plane Crashed: उड्डाण घेतल्यानंतर २६ सेकंदानंतर काय घडलं? अहमदाबाद विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती उघड

Ahmedabad Plane Crashed: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये २७५ जणांचा मृत्यू झाला होता. या विमान अपघाताचा तपास करण्यात येत आहे. उड्डाण घेतल्यानंतर २६ सेकंदानंतर नेमकं काय घडलं? याची धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली.

Priya More

अहमदाबादमध्ये १२ जूनला विमानाला अपघात झाला होता. उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान काही मिनिटांमध्येच खाली कोसळले. या विमान अपघातामध्ये २७५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताचा तपास सुरू होता. या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोइंग ड्रीमलाइनर विमानाच्या मलब्याचा तपास करणाऱ्या टीमने विमानाच्या मागील भागात मर्यादित विद्युत आगीचे चिन्ह आढळून आले. विमान अपघात आणि इंधन स्फोटामुळे मागील भागाला तुलेने कमी नुकसान झाले. काही विद्युत भागांमधअये मर्यादित आग लागली होती ज्यावरून असे दिसून येते की उड्डाणादरम्यान वीज पुरवठ्याची समस्या असू शकते.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तामध्ये तपास अधिकाऱ्यांचा हवाला देत असे सांगितले आहे की, टेल सेक्शनमधून जप्त केलेले साहित्य अहमदाबादमध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहे आणि त्याद्वारे वीज यंत्रणेत कोणती तांत्रिक बिघाड झाला हे शोधले जाणार आहे. विमानाचा मागचा ब्लॅक बॉक्स बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या छतावर सापडला होता परंतु तो थर्मलमुळे इतका खराब झाला होता की डेटा काढणे शक्य नव्हते. तर १६ जून रोजी ढिगाऱ्यातून ब्लॅक बॉक्स सापडला आणि त्यातून ४९ तासांच्या उड्डाणाची माहिती आणि ६ उड्डाणांचा डेटा, तसंच अपघातापूर्वीच्या दोन तासांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगची माहिती काढली जाऊ शकते.

अपघातापूर्वी, AI-423 (दिल्ली ते अहमदाबाद) उड्डाणादरम्यान स्टॅबिलायझर पोझिशन ट्रान्सड्यूसरमध्ये एक बिघाड आढळून आला होता. जो अहमदाबादमधील देखभाल पथकाने दुरुस्त केला होता. परंतु अपघाताच्या वेळी हा घटक विमानाच्या मागच्या भागात म्हणजे शेपटीच्या भागात होता जो आता तपासाचा केंद्रबिंदू बनला आहे. विमानाचे ऑक्झिलरी पॉवर युनिट देखील टेल सेक्शनमध्ये आहे जे सुरक्षित आणि अबाधित आढळले आहे. APU चा वापर इंजिन सुरू करण्यासाठी आणि उड्डाणादरम्यान बॅकअप पॉवर प्रदान करण्यासाठी केला जातो. अपघाताच्या वेळी APU ऑटो-स्टार्ट मोडमध्ये सक्रिय केले गेले होते जे हे दर्शवते की कदाचित मुख्य पॉवर सिस्टम बिघडली होती.

दरम्यान, अपघातानंतर ७२ तासांनी एका फ्लाईट अटेंडंटचा मृतदेह शेपटीच्या भागातून बाहेर काढण्यात आला. ती आगीत जळाली नव्हती तर सीट बेल्ट बांधल्यामुळे आणि धडकेमुळे तिचा मृत्यू झाला होता. तिच्या साडीच्या अवशेषांवरून तिची ओळख पटली. जास्त वेळ झाल्यामुळे आणि अग्निशमन रसायनांच्या वापरामुळे मृतदेह कुजला होता. ब्लॅक बॉक्स डेटावरून असे दिसून आले की, काही सेकंदातच दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा थांबला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता फुटला, भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

Knee Pain: सतत गुडघे दुखणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

Maharashtra Politics: पालिकांवर नजर, ठाकरेसेनेचं शक्तीप्रदर्शन, भ्रष्ट मंत्र्यांवरून सरकारला घेरलं

SCROLL FOR NEXT