Air India Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. टेक ऑफ घेतल्यानंतर काही सेकंदांमध्ये विमान कोसळले. या विमानामध्ये दोन पायलट, १० केबिन क्रू आणि प्रवासी असे २४२ जण असल्याची माहिती समोर आली आहे. टेक ऑफनंतर ७०० फुटाहून विमान खाली कोसळले. या विमान अपघाताचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
एअर इंडियाचे बी ७८७ विमान व्ही टी एएनबी उड्डाण क्रमांक एआय १७१ साठी उड्डाण केल्यानंतर लगेच खाली कोसळले. विमान खाली कोसळल्यानंतर त्याला आग लागली असे म्हटले जात आहेत. अपघातामुळे सर्वत्र धुर पाहायला मिळाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक, अग्निशमन दल आणि आरोग्य पथके घटनास्थळी दाखल झाली. लगेचच घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात झाली.
अपघातानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक विमान इमारतीच्या आरपार घुसले असल्याचे पाहायला मिळते. विमान पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. हे एअर इंडियाचे एआय १७१ विमान असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण याची सत्यता तपासणे आवश्यक असल्याचे पीटीआयने म्हटले आहे.
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन विमानाचा उड्डाण घेतले होते. टेक ऑफ घेतल्यानंतर थोड्या वेळात मेघानीनगर परिसरात विमान कोसळले. मेघानी नगरमधील डॉक्टरांच्या हॉस्टेलवर विमान कोसळले असल्याचे म्हटले जात आहे. अपघातात १५ डॉक्टर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.