Black Box Saam
देश विदेश

Ahmedabad plane crash: अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला, २६५ जणांच्या मृत्यूचं खरं कारण मिळणार

Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला असून, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान घटनास्थळावरून ब्लॅक बॉक्स सापडला आहे. हा बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

गुजरातमधील अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला असून, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यात दोन पायलट, १० क्रू मेंबर्स आणि विविध देशांतील प्रवासी यांचा समावेश आहे. दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. ब्लॅक बॉक्समुळे आता दुर्घटनेचं नेमकं कारण समोर येणार आहे. अधिक विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलं आहे. तर, दुसरा ब्लॅक बॉक्स अद्याप सापडलेला नाही. दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू आहे.

दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स (फ्लाइट डेटा रेकॉर्डर) घटनास्थळी सापडला असून, तो अधिक तपासासाठी दिल्लीला पाठवण्यात आला आहे. दुसरा ब्लॅक बॉक्स (कॉपिट व्हॉइस रेकॉर्डर) अद्याप सापडलेला नाही, आणि त्याचा शोध सुरू आहे. ब्लॅक बॉक्समधील माहितीच्या आधारे अपघाताचं नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद विमान अपघातात २६५ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात २ पायलट आणि १० क्रू मेंबर्सचा समावेश आहे. मृतांमध्ये राज्यातील ९ जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनच्या दिशेनं उड्डाण करत होते. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे.

दरम्यान, मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. टाटा समूहाकडून १ कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच जखमींचा उपचारचा खर्चही टाटा समूहच करणार असल्याची माहिती आहे. यासह डॉक्टरांच्या वस्तीगृहाचे झालेल्या नुकसानानंतर हॉस्टेल नव्यानं बांधून देणार असल्याचं टाटा समूहानं जाहीर केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT