Ahmedabad Air Crash Saam TV News
देश विदेश

Ahmedabad Air Crash: ८० डॉक्टरांना वाचवलं, पण आई अन् चिमुकलीला गमावलं, विमान अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं?

Ahmedabad Air Crash: अहमदाबाद विमान अपघातात रवी ठाकोर यांची आई आणि मुलगी मृत्युमुखी पडली, पण त्यांच्या टिफिनसेवेमुळे ८० डॉक्टरांचे प्राण वाचले.

Bhagyashree Kamble

अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात आतापर्यंत ३६५ लोकांनी प्राण गमावले आहेत. या दुर्घटनेत रवी ठाकोर यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा दु्र्देवी मृत्यू झाला. त्यांची आई आणि दोन वर्षाच्या चिमुकलनं आपले प्राण सोडले. मात्र, या घटनेदरम्यान रवी ठाकोर यांच्यामुळे नकळतपणे जवळपास ८० डॉक्टरांचे प्राण वाचले. पण ठाकोर कुटुंबावर सध्या दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

रवी ठाकोर हे गेल्या १५ वर्षांपासून बीजे मेडिकल कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांना नियमित जेवण पुरवत आहेत. अपघाताच्या दिवशी, १ वाजता ते नेहमीप्रमाणे टिफिन देण्यासाठी पत्नी, वडील व एका नातेवाईकाशी बाहेर पडले. त्यांची दोन वर्षांची मुलगीदेखील सोबत येण्याचा हट्ट करत होती. ती झोपल्यानंतर रवी यांनी तिला तिच्या आई सरला ठाकोर यांच्याकडे मेसमध्ये ठेवले आणि टिफिन घेऊन हॉस्पिटलकडे रवाना झाले.

जेव्हा रवी डॉक्टरांना जेवण देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले, तेव्हा त्यांनी डॉक्टरांना कॅन्टीनऐवजी आतच जेवायला सांगितले. त्याच क्षणी, जवळपास १:४० वाजता विमान अपघात झाला. जे डॉक्टर कॅन्टीनमध्ये जायचे होते, ते आतच थांबले आणि यामुळे त्यांचे प्राण वाचले. जवळपास ८० डॉक्टरांचे प्राण वाचले असल्याची माहिती आहे.

"होत्याचं नव्हतं झालं"

रवी ठाकोर सांगतात, 'माझी मुलगी रडत होती, पण टिफिन घ्यावं म्हणून तिला आईसोबत ठेवून निघालो. स्फोट झाला, सगळीकडे गोंधळ उडाला. धूरच धूर होता. आई आणि मुलगी मेसमध्येच होत्या. पोलिसांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही', अशी माहिती त्यांनी दिली.

'दोन दिवस आम्ही आई आणि मुलीचा शोध घेत होतो. पण आई आणि मुलगी काही सापडली नाही. शेवटी डीएनए अहवाल समोर आला. आई आणि मुलीच्या मृतदेहाचा ताबा देण्यासाठी आम्हाला बोलावण्यात आलं. गुरूवारी दोघांचे अंतिम संस्कार पार पडले'. या घटनेनंतर ठाकोर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha bhandhan 2025 : सुख समृद्धी प्राप्त होणार; या रक्षाबंधनाला ५ राशींच्या लोकांचं आयुष्य चमकणार

Triekadash Yog 2025: १५ ऑगस्टपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु; बुध-मंगळ तयार करणार पॉवरफुल योग

Todays Horoscope: आज रक्षाबंधन असून आर्थिक निर्णय मार्गी लागतील; वाचा आजचं राशीभविष्य

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

SCROLL FOR NEXT