Shocking: धावत्या रिक्षातील बॅटरीचा स्फोट अन् क्षणात सांगाडा; महिला जिवंत जळाली, अनेक प्रवासी जखमी

Woman Dies in Auto Fire: मुझफ्फरपूरमध्ये धावत्या रिक्षाच्या बॅटरीचा स्फोट होऊन महिलेचा जळून मृत्यू झाला आहे. इतर प्रवासीही गंभीर जखमी झाले असून, पोलीस तपास सुरू आहे.
Muzaffarpur
Woman dies after e-rickshaw battery catches fireSaam TV News
Published On

धावत्या रिक्षाच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्याकारणानं महिला प्रवाशाचा जळून मृत्यू झाला आहे. ही भयानक घटना बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये घडली आहे. घटनेच्यावेळी ऑटोमध्ये महिलेसोबत इतरही प्रवासी होते. या दुर्घटनेत त्यांनाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच सर्व जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केलं. दरम्यान, इतर प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुबनीच्या खजौली येथील रस्त्यावर ही धक्कादायक घटना घडली. गयाघाट पोलीस स्टेशन परिसरात ऑटोच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. बॅटरीचा स्फोट झाल्यानंतर काही क्षणात ऑटोनं पेट घेतला. त्यामुळे ऑटोमधील प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्या.

Muzaffarpur
Crime: बॉयफ्रेंड की मित्र? गर्लफ्रेंड रात्री कुणासोबत थांबणार? वाद टोकाला गेला अन्..मध्यरात्री नको ते घडलं

मुख्य म्हणजे महिला आगीत जिवंत जळाली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

Muzaffarpur
Shocking: सनकी बॉयफ्रेंड! गर्लफ्रेंडचा गळा चिरला, तुकडे करून सुटकेसमध्ये भरले अन् ...

तसेच जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले. मृत महिलेचं नाव कमरूल निशा असे असून, ती मधुबनी जिल्ह्यातील खजौली येथील डुमरियाही येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबाला याची माहिती दिली. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत. या घटनेनंतर ही दुर्घटना नेमकी कशी घडली? याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com