Air India Plane Crash Saam Tv
देश विदेश

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Priya More

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. या विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर १२ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

गुजरातचे पोलिसा उपायुक्त कानन देसाई यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तर, या अपघातामध्ये विमानातून प्रवास करणारे २४१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातामध्ये सुदैवाने एक प्रवासी बचावला. या प्रवाशाने विमानातून उडी मारल्यामुळे त्याचे प्राण वाचले. अपघातानंतर विमान जवळच्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. त्यामुळे २४ जणांचा मृत्यू झाला. विमानातील २४१ आणि विमान पडलेल्या ठिकाणचे २४ असे एकून २६५ जणांचा या दुर्घटनेच मृत्यू झाला.

गुजराच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे मृतदेह आले आहेत ते सर्व पूर्णपणे जळाले आहेत. त्यामुळे ओळख पटवणे खूपच कठीण झाले आहे. अनेक मृतदेहाचे तुकडे झाले आहेत. काही मृतदेह जळाले आहेत तर काही कापले गेले आहेत. या रुग्णालयात परिस्थिती खूपच भयंकर आहे. आता डीएनए चाचणीद्वारे मृतदेहाची ओळख पटवली जाणार आहे. या भीषण विमान अपघातानंतर मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाचे नुकसान झाले. अनेक वाहनं आणि झाडं जळाली.

दरम्यान, गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतले. हे विमान लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाणार होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमान अचानक खाली कोसळले. अपघाताशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अपघातानंतर विमानाचे तुकडे तुकडे झाले. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागपुरात नागरी सत्कार सोहळा

Son Of Sardaar 2 : ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, अजय देवगनचा 'सन ऑफ सरदार २' ओटीटीवर कुठे पाहता येणार?

Honda Bike: होंडाने लाँच केली स्वस्त बाईक; Hero Xtreme ला जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Cyber Crime News : टेलिग्रामवर नोकरीचं आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक; मुंबईतील धक्कादायक घटना

Kumbha Rashi : कुंभ राशीचे भाग्य आज उजळणार, गरिबी होणार दूर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT