Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking: वहिनीचा आंघोळ करताना आक्षेपार्ह VIDEO काढला, दीराकडून नको ती मागणी; नकार देताच कपडे फाडून मारहाण

Agra man blackmails sister in law with video: एका दिराने वहिनीसोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी तिचा आंघोळ करत असताना आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. वहिनीने नकार देताच आरोपीने तिच्याकडे एक लाख रूपयांची मागणी केली.

Bhagyashree Kamble

दीर आणि वहिनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. आग्रा येथील एका दीराने वहिनीसोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी तिचा आंघोळ करत असताना आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. वहिनीने नकार देताच आरोपीने तिच्याकडे एक लाख रूपयांची मागणी केली. पीडित महिलेनं दीराची तक्रार आपल्या पतीकडे केली असता, दीराने आपल्या भावाला आणि वहिनीला बेदम मारहाण केली. तसेच त्यांचे कपडेही फाडले. पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

ही धक्कादायक घटना आग्रा येथील मंटोला पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावात घडली आहे. पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दीराने आधी महिलेचे आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ शूट केला. तसेच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. तिने नकार देताच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने १ लाख रूपयांची मागणी केली.

१७ एप्रिल रोजी दीराने कुटुंबासमोर वहिनीला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच तिचा विनयभंग केला. पतीने पत्नीला वाचवण्यासाठी धावून आल्यानंतर त्यालाही मारहाण केली. तसेच दोघांचे कपडेही फाडले.

या घटनेनंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांसमोर आपबिती सांगितली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच गुन्हा देखील दाखल केला. या घटनेनंतर परिसरातील दीराविरोधात रोष व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या जवळच्या सहकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल, धनंजय मुंडेंचेही कनेक्शन?

Maharashtra Live News Update : संजय राऊत यांना आज मिळणार डिस्चार्ज

Indurikar Maharaj Name: इंदुरीकर महाराजांचं खरं नाव काय? कोणालाच माहित नाही

Skin Care: लग्न सोहळ्यात सगळ्यात उठून दिसायचं आहे? मग फॉलो करा 'हे' घरगुती स्किन केयर टिप्स

पुण्यात शिंदे सेनेला नव्या भिडूची साथ; फडणवीस - पवार यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, युतीची घोषणा

SCROLL FOR NEXT