Agra court sentenced BJP MP Ram Shankar Katheria to two years imprisonment,possibility of cancellation MP post Saam TV
देश विदेश

Politics News: भाजप खासदाराला कोर्टाचा दणका, तोडफोड प्रकरणात सुनावली 2 वर्षांची शिक्षा; खासदारकीही रद्द होणार?

BJP MP Ram Shankar Katheria News: माजी केंद्रीय राज्यमंत्री तसे भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशातील इटावा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राम शंकर कठेरिया यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Satish Daud

BJP MP Ram Shankar Katheria News: माजी केंद्रीय राज्यमंत्री तसे भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशातील इटावा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राम शंकर कठेरिया यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

‘टोरेंट पॉवर’च्या कार्यालयाची तोडफोड करणे, त्याचबरोबर अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी आग्रा येथील खासदार/आमदार न्यायालयाच्या विशेष दंडाधिकाऱ्याने ही शिक्षा सुनावली.

दरम्यान कोर्टाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेनंतर राम शंकर कठेरिया यांची खासदारकी सुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, खासदार राम शंकर कठेरिया यांनी १६ नोव्हेंबर २०११ मध्ये मॉलमधील ‘टोरेंट पॉवर’ कार्यालयाची तोडफोड केली होती. त्याचबरोबर खासदार राम शंकर कठेरिया यांनी काही अधिकाऱ्यांना देखील मारहाण केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता. आग्रा येथील न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. दरम्यान, शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला.

त्यानंतर कोर्टाने निकाल देत खासदार राम शंकर कठेरिया यांना दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे कठेरिया यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाने सुनावलेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेवर खासदार राम शंकर कठेरिया यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली.

मी आज नेहमीप्रमाणे न्यायालयात हजर झालो. न्यायालयाने माझ्याविरोधात निर्णय दिला आहे. मी न्यायालयाचा पूर्ण आदर करतो. मला अपील करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा मी वापर करेन, असं खासदार राम शंकर कठेरिया यांनी म्हटलं आहे.

राम शंकर कठेरिया हे उत्तर प्रदेशातील इटावा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम १४७ (दंगल) आणि ३२३ (दुखापत करणे) अंतर्गत दोषी ठरवलं आहे. राम शंकर कठेरिया यांनी यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री आणि एससी-एसटी आयोगाचे अध्यक्षपद भूषवलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT