TMC split latest news in West Bengal : ४ वर्षांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडली होती. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह वेगळी चूल मांडल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा असाच एक पक्ष फुटणार का? असा सवाल उपस्थित झालाय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. अनेक नाराज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश कलाय, तर काही आमदार-खासदार अद्यापही नाराज आहेत. भाजप खासदाराने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे ५० आमदार नाराज असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्षही ठाकरेंच्या शिवसेनेसारखाच फुटणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये ममता बॅनर्जी यांचा दारूण पराभव झाला होता. पण भाजपच्या विजयानंतर पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून निघाले. आता तृणमूल काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फूट पडू शकते, असा दावा, भाजपाच्या खासदाराने केला आहे. टीएमसीचे निम्म्याहून अधिक खासदार पक्ष बदलण्यास तयार आहेत. २० खासदारही टीएमसी सोडू शकतात. त्याशिवाय ५० आमदार नाराज आहेत, असा दावा भाजप खासदार सौमित्र खान यांनी बुधवारी कला आहे. दरम्यान, टीएमसीने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
७० आमदार, २० खासदार नाराज ?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे ८० आमदार आहेत. त्यापैकी ५० आमदार नाराज असल्याची प्रतिक्रिया सौमित्र खान यांनी दिली. ते म्हणाले की, २० खासदारही अशाच परिस्थितीत आहेत. जर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने संमती दिली, तर हे नेते पक्ष बदलून भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहेत. मात्र भाजपच्या हायकमांडने अद्याप याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
...तर टीएमसी राज्यातून संपणार -
पश्चिम बंगालमधील एका भाजप खासदाराच्या मते जर आमदार-खासदार फुटले तर टीएमसी राज्यातून संपेल. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकदा परवानगी दिली तर टीएमसी पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात येईल. प्रत्येकजण पक्षात सामील होण्यास तयार आहे. ५० आमदार पक्षावर नाराज असून, २० खासदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाआधी टीएमसीचे खासदार भाजपमध्ये सामील होऊ शकतात.
टीएमसी अडचणीत?
ममता बॅनर्जी यांच्या १०० नगरसेवकांनी राजीनामा दिल्यानंतर खासदार खान यांचे हे वक्तव्य आल्यानंतर बंगालमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. काकोली घोष दस्तीदार आणि फिरहाद हकीम यांच्यासारखे प्रमुख नेते टीएमसी नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. आमदार हकीम यांनी उघडपणे काहीही भाष्य केलेले नाही, तर दस्तीदार यांनी आधीच आपली नाराजी व्यक्त केली आहे.
टीएमसीच्या २ आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा या टीएमसीच्या २ आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष रतिंद्र बोस उपस्थित होते. निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्षात बदलत असलेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे तर्कवितर्क लावले जात आहे. ही 'सदिच्छा भेट' म्हणून सांगितले जात असले तरी यामागे मोठ्या राजकीय घडामोडी असल्याचे बोलले जात आहे.
२० खासदार भाजपात जाणार ?
फेडरलिझम डेली यांनी सूत्रांच्या हवाल्याने टीएमसीचे २० खासदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. तृणमूल काँग्रेसचे १२ खासदार भाजपमध्ये सामील होण्यास अथवा पाठिंबा देण्यास सध्या तयार आहेत. इतकेच नाही तर पक्षांतर करण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांच्या यादीत आणखी पाच ते सहा जणांचा समावेश आहे. हे खासदार कोण असतील किंवा ते पक्षांतर करण्याची योजना केव्हा आखत आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर नाही. सूत्रांच्या मते, टीएमसीमधील २० खासदार लवकरच भाजपमध्ये सामील होऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.