Who Is Abhishek Singh? Saam Tv
देश विदेश

Who Is Abhishek Singh: पूजा खेडकर यांच्यानंतर माजी IAS अधिकारी रडारवर! अपंगत्वाचा केला होता दावा, कोण आहेत अभिषेक सिंह?

Ex-IAS officer Abhishek Singh News: वादात सापडलेल्या आयएएस पूजा खेडकर यांच्यानंतर आता आणखी एक माजी आयएएस अभिषेक सिंह चर्चेत आले आहेत. नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप आहे. त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

साम टिव्ही ब्युरो

वादात सापडलेल्या आयएएस पूजा खेडकर यांच्यानंतर आता आणखी एक माजी आयएएस अभिषेक सिंह रडारवर आले आहेत. आयएएस पूजा खेडकर यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप आहे. याशिवाय ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी स्वत:ला नॉन क्रिमी लेयर ओबीसी घोषित केले होते. यानंतर आता पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाची कारवाई केलीय.

आता या वादांमध्ये उत्तर प्रदेशातील आणखी एका आयएएसचे नाव पुढे येत आहे. उत्तर प्रदेश कॅडरचे माजी आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांच्या निवडीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, माजी आयएएस अधिकारी अभिषेक सिंह हे देखील वादात सापडले आहेत. त्याच्या अपंगत्वाच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अभिषेक सिंह यांच्यावर यूपीएससीमध्ये निवड होण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे, त्यानंतर अभिषेक सिंह यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपली बाजू मंडळी आहे.

वर्ष 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांनी पूजा खेडकर वादानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी प्रशासकीय निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी केली होती. त्यानंतर काही युजर्सनी त्याच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. यूपीएससीमध्ये निवडीसाठी बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

या आरोपांना उत्तर देताना माजी आयएएस अभिषेक सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, ''मला कोणत्याही टीकेचा त्रास होत नाही, पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे घडले आहे, जेव्हा मी माझ्या टीकाकारांना प्रत्युत्तर देत आहे. माझे हजारो समर्थक मला प्रत्युत्तर देण्यास सांगत आहेत, अन्यथा आमचे मनोधैर्य खचले जाईल. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून सत्य मांडणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे हे उत्तर माझ्या विरोधकांना नाही तर माझ्या समर्थकांना समर्पित आहे.''

माजी आयएएस अभिषेक सिंह यांनी पोस्ट करत म्हटलं आहे आहे की, जेव्हापासून त्यांनी आरक्षणाच्या बाजूने आवाज उठवायला सुरुवात केली, तेव्हापासून आरक्षणाच्या विरोधकांच्या एका गटाने सर्व काही सोडून त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांच्या पचनी पडत नाही की एक जनरल कॅटगरीचा मुलगा आरक्षणाच्या बाजूने कसा बोलतोय?

अभिषेक सिंह म्हणाले की, आधी तुम्ही माझ्या जातीवर प्रश्न केला आणि मी खोटं बोलत असल्याचं सांगितलं, नंतर तुम्ही म्हणाला की, मी माझी नोकरी परत मागत आहे, आणि आता तुम्ही म्हणत आहात की, मी आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी घेतली आहे. मला तुम्हाला खूप नम्रपणे एक गोष्ट सांगायची आहे. अभिषेक सिंह त्याच्या मेहनत आणि धैर्यासाठी ओळखला जातो. कोणाच्या उपकारासाठी नाही. मी माझ्या आयुष्यात जे काही मिळवले आहे, ते मी कोणत्याही आरक्षणाच्या जोरावर नाही, तर माझ्या मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे.

कोण आहेत माजी आयएएस अभिषेक सिंह?

माजी आयएएस अभिषेक सिंह हे मूळचे जौनपूरचे आहेत. त्यांचे वडील कृपाशंकर सिंह हे देखील यूपीमध्ये आयपीएस होते. वर्ष 2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांना निवडणूक आयोगाने निरीक्षक बनवले होते, यानंतर ते चर्चेत आले होते. यादरम्यान त्यांनी सरकारी गाडीसमोर फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. गुजरातमधून परतल्यानंतर ते पुन्हा यूपी केडरमध्ये आले.

याआधी अभिषेक याना 2015 पासून तीन वर्षांसाठी दिल्लीला प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. यानंतर आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली. मात्र यादरम्यान ते वैद्यकीय रजेवर गेले. पुढे दिल्ली सरकारने अभिषेक यांना त्यांच्या मूळ कॅडर यूपीमध्ये परत पाठवले होते. मात्र ते बराच काळ ड्युटीवर रुजू झाले नाही. नंतर 30 जून 2022 रोजी ते ड्युटीवर रुजू झाले. या काळात त्यांना काही काळासाठी निलंबितही करण्यात आले होते. नंतर त्यांनी 2023 मध्ये राजीनामा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT