Ajit Doval Warning To Pakistan Saam Tv
देश विदेश

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा पुढचा प्लान काय? अजित डोवाल यांचा पाकिस्तानला इशारा

Ajit Doval Warning To Pakistan: भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे ९ तळ नष्ट केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देईल असे बोलले जात आहे. अशामध्ये अजित डोवाल यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

Priya More

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री दीड वाजता पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैन्यांनी दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने मध्यरात्री पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात पाकिस्तानचे १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. या हल्ल्यांनंतर पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. अशामध्ये पाकिस्तान प्रत्युत्तरात्मक कारवाई करेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

भारताने ऑपरेश सिंदूरनंतर पुन्हा पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करेल असे म्हटले जात आहे. कारण माजी लष्कर प्रमुखांनी 'पिक्चर अभी बाकी है!' अशी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यामुळे भारत ऑपरेश सिंदूरप्रमाणेत आणखी एक ऑपरेशन करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. अशातच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानला चांगलाच इशारा दिला आहे. 'जर सीमेपलीकडून कोणत्याही प्रकारची आक्रमकता दाखवली गेली तर त्यांना योग्य उत्तर दिले जाईल.', असे अजित डोवाल यांनी सांगितले.

याआधी बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्यात आला होता. भारताच्या या हल्ल्यानंतर असीम मुनीरचे सैन्य आधीच घाबरले आहे. 'यावेळी जर पाकिस्तानने काही चूक केली तर त्याला सोडले जाणार नाही.', असे अजित डोवाल यांनी स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्य भारताला बदनाम करण्यासाठी अपप्रचार पसरवत होते. भारताने उद्ध्वस्त केलेल्या लष्कराच्या अड्ड्याला सामान्य नागरिकांचे अड्डे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सैन्य आणि सरकार करत होते. दरम्यान, लष्कर-ए-तैयबाने एक व्हिडिओ जारी केला होता आणि त्यात म्हटले होते की हे त्यांचे मुख्यालय आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये घुसून भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे ९ तळ नष्ट केले. या कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब मारले गेले. मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरचा भाऊ आणि वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुजैफा असगर, रऊफ असगरच्या भावाची बायको यांचा मृत्यू झाला. मसूद अजहरची मोठी बहीण देखील हल्ल्यात ठार झाली आहे. तर मुफ्ती अब्दुल रऊफची नातवंडं, बाजी सादियाचे पती आणि त्याच्या मोठ्या मुलीची चार मुलं जखमी झाली आहेत. या हल्ल्यात बहुतेक महिला आणि मुलं मारली गेली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT