Azam Khan Saam TV
देश विदेश

आखिलेश यादव यांच्यानंतर आझम खान यांचाही खासदारकीचा राजीनामा, कारण...

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर चर्चा होती की आखिलेश यादव लोकसभेचा राजीनामा देणार की विधानसभेचा.

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) अध्यक्ष आखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा (Lok Sabha membership) दिला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये आखिलेश यादव करहल विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. आखिलेश यादव २०१९ मध्ये आझमगढ लोकसभा मतदार संघातून निवडणून आले आहेत. आखिलेश यांच्यासोबतच आझम खान यांनीही खासदराकीचा राजीनामा दिला आहे. आझम खान रामपुर विधानसभा मतदार संघातून निवडणून आले आहेत.

दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर चर्चा होती की आखिलेश यादव लोकसभेचा राजीनामा देणार की विधानसभेचा. करहल विधानसभेची आमदारकी ते सोडू शकतात अशी चर्चीही होती. आता त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या सर्व चर्चांना ब्रेक लागला आहे.

आखिलेश यांनी केंद्रीय मंत्र्याला हरवले

करहल मतदार संघातून आखिलेश यादव यांनी केंद्रीय मंत्री एसपी सिंग बघेल यांना मोठ्या फरकाने हरवले होते. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द मुलायम सिंग यादव ही प्रचाराच्या मैदानात होते. परंतु १०० जागांचा आकडा पार करत सपा दुसरा मोठा पक्ष बनला आहे.

आखिलेश यांची भाजपावर टीका

अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधत म्हणाले 'भाजपच्या राजवटीत लोकशाहीचे रक्षण करण्याची अपेक्षा करणे म्हणजे दिवसा तारे शोधणे आहे. हा मसल पॉवरचा अत्यंत निषेधार्ह प्रकार आहे, एकतर फॉर्म भरू दिला जाणार नाही किंवा निवडणुकीवर परिणाम होईल किंवा निकालावर परिणाम होईल. पराभवाची भीतीच जनमत चिरडून टाकते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT