arrest Saam Tv
देश विदेश

आफ्रिकन महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून आणले 10 कोटींचे ड्रग, डॉक्टरांनी बाहेर काढल्या 60 कॅप्सूल!

31 वर्षीय महिला मूळची आफ्रिका येथील युगांडा देशाची असून, अमानी हैवेंस लोपेज असे तिचे नाव आहे.

वृत्तसंस्था

राजस्थान - जयपूर विमानतळावर एका आफ्रिकन महिलेला ड्रग्जची तस्करी करताना पकडण्यात आले आहे. आफ्रिकन महिलेने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ड्रग कॅप्सूल लपवून ठेवले आणल्याचं समजल्यानंतर अधिकारी देखील चकित झाले. महसूल संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकार्‍यांनी या महिलेला सांगानेर विमानतळावर (Airport) संशयाच्या आधारे पकडले, त्यानंतर तिची झडती घेतली असता ही बाब उघडकीस आली.

डीआरआय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, महिलेने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये 60 ड्रग कॅप्सूल लपवून ठेवल्या होत्या, ज्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. 31 वर्षीय महिला मूळची आफ्रिका येथील युगांडा देशाची असून, अमानी हैवेंस लोपेज असे तिचे नाव आहे.

हे देखील पहा -

हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी कॅप्सूल काढल्या

ही महिला शारजहांला जाणाऱ्या फ्लाइटने जयपूरला पोहोचली होती, त्यानंतर विमानतळावरील कस्टम टीमला महिलेची वागणूक संशयास्पद वाटू लागल्याने तिची झडती घेतली मात्र तिच्याकडे काही सापडले नाही. यानंतर गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने महिलेला ताब्यात घेतले आणि महिलेला सवाई मानसिंग रुग्णालयात पाठवले आणि तिची बॉडी स्कॅन करून घेतली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला.

अधिकार्‍यांनी सध्या महिलेकडून कॅप्सूल जप्त केले आहेत, ज्यामध्ये फक्त हेरॉईन आणि कोकेन पावडर असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, महिलेला अटक केल्यानंतर राजस्थानमधील हे संपूर्ण नेटवर्क तोडण्यासाठी डीआरआय काम करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT