नितेश राणेंच्या ट्वीटवर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया म्हणाल्या...

या प्रकरणी आम्ही कोणालाही नोटीस दिली नाही मात्र अहवाल आल्यावर त्यानुसार पुढील कारवाई होईल.
Rupali Chakankar Replies to Nitesh Rane Tweet
Rupali Chakankar Replies to Nitesh Rane TweetSaam Tv
Published On

सोलापूर - काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सॅलियनच्या मृत्यूसंबंधी बोलताना काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट केले आहे. नितेश राणेंच्या या ट्वीटवर रुपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Rupali Chakankar Replies to Nitesh Rane Tweet)

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आपल्या कडे जी तक्रार आहे त्याचा प्राथमिक तपास हा मालवणी पोलिसांनी केला आहे. त्यामुळे मालवणी पोलिसांचा अहवाल आल्यावर त्यात काय तथ्य आहे हे पाहणे गरजेचे आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, त्या अहवालात किती तथ्य आहे हे पाहून याची चाचपणी केली जाईल. तसेच महिला आयोग कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. एकाद्या महिलेची मृत्यूपश्चात बदनामी होते हे खेदजनक आहे. या संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. या प्रकरणी आम्ही कोणालाही नोटीस दिली नाही मात्र अहवाल आल्यावर त्यानुसार पुढील कारवाई होईल असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.

Rupali Chakankar Replies to Nitesh Rane Tweet
Accident: लग्न सोहळ्यातून परतणारी कार दरीत कोसळली, 14 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

नितेश राणे यांचे ट्विट

"मालवणी पोलिसांनी योग्य तपास न केल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. बरोबर ना? आणि आता याच पोलिसांना महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे? हे किती योग्य आहे? नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे?,” असा सवाल नितेश राणेंनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com