अफगाणिस्तानच्या डोक्यावर नवीन संकट, IS कडून हल्ला होण्याची शक्यता; अमेरिकेनं दिला इशारा Saam Tv
देश विदेश

अफगाणिस्तानच्या डोक्यावर नवीन संकट, IS कडून हल्ला होण्याची शक्यता; अमेरिकेनं दिला इशारा

अफगाणिस्तानात तालिबाननं कब्जा घेतल्यावर देशाची स्थिती गंभीर होत चाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : अफगाणिस्तानात Afghanistan तालिबाननं Taliban कब्जा घेतल्यावर देशाची स्थिती गंभीर होत चाली आहे. लोक देश सोडून जाण्याकरिता जोरदार प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता अमेरिकेनं America दिलेल्या इशाऱ्याने लोकांची चिंता आणखी वाढली आहे. अमेरिकेनं आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे. या इशाऱ्यामध्ये अमेरिकेनं म्हटले आहे की, काबूल विमानतळाजवळ Kabul Airport येऊ नका.

काबूल विमानतळावर इस्लामिक स्टेट IS हल्ला करण्याची भीती त्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या नागरिकांना अगोदरच सतर्क केले आहे. काबूल विमानतळावर सतत गोंधळ सुरू आहे. देश सोडण्याकरिता हजारो लोकं विमानतळावर गर्दी करत आहेत. त्यांच्या नियंत्रणाकरिता अमेरिकन सैन्य तैनात आहे. अफगाणिस्तान मधील परिस्थिती सतत बिकट होत आहे.

हे देखील पहा-

अशा परिस्थितीत मध्ये अमेरिकेनं आता आपल्या नागरिकांना विमानतळाकडे जाण्यास पूर्णपणे सक्त मनाई केली आहे. सध्या काबूल विमानतळाचे नियंत्रण अमेरिकन सुरक्षा दलांच्या हातामध्ये आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी विमानतळाच्या दाराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमू नये, याकरिता सूचना जारी करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत विमानतळावर परिस्थिती हि गंभीर बिकट आहे.

अफगाणिस्तान मधून अमेरिकन सैन्य माघारी परतल्यानंतर तालिबान्यांनी आता राजधानी काबुलला चारही बाजूंनी घेरले आहे. यामुळेच देशात हल्ल्यांचा धोका परत वाढला आहे. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यावर प्रत्येक देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान मधून बाहेर काढण्याकरिता प्रयत्न करत आहे. त्यात भारत देशाकडून देखील प्रयत्न सुरु आहेत.

भारत सातत्याने हवाई दलाच्या विमानांनी भारतीय नागरिकांना परत आणत आहे. दरम्यान, भारत सरकारने Indian Government आता अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित वापसीकरिता रोज २ उड्डाणे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या सरकारी सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याकरिता भारताला काबूल मधून रोज २ उड्डाणे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT