Afghanistan strikes back — denies visa to Pakistan’s Defence Minister and ISI Chief amid deadly border conflict. saam tv
देश विदेश

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांना काबूलने व्हिसा नाकार दिलाय.

Bharat Jadhav

  • अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सीमेवरील तणाव वाढला

  • अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि आयएसआय प्रमुखाला व्हिसा नाकारला आहे.

  • गोळीबारात दोन्ही देशांच्या सैनिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतोय. दोन्ही देशाच्या सीमेवर गोळीबार सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हल्ल्यांसाठी एकमेकांना दोषी ठरवले जातंय. अफगाण अधिकाऱ्यांच्या मते, पाकिस्तानी सैन्याने केलेल्या सीमा उल्लंघनाला अफगाण सैन्याने प्रत्युत्तर दिले आहे. यात ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाले.

दुसरीकडे २०० हून अधिक तालिबानी लढवय्ये मारले गेल्याचा दावा पाकिस्तानने केलाय. दोन्ही देशातील तणावाच्या काळात, अफगाणिस्तानने पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय. काबूलमधील इस्लामाबादच्या शांतता प्रयत्नांना तीव्र प्रत्युत्तर देताना, पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक आणि इतर दोन वरिष्ठ पाकिस्तानी जनरल यांचे व्हिसा अर्ज नाकारण्यात आलेत.

अफगाणिस्तानमधील वृत्तवाहिनी टोलो न्यूजच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, तीन दिवसांपासून या अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानला भेट देण्यासाठी व्हिसा मागितला होता, परंतु काबूलने व्हिसा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ला केला, ज्यामुळे सीमेवर जोरदार चकमकी झाल्या, असे अफगाण अधिकाऱ्यांनी सांगितले.

शनिवारी रात्री अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ला केला होता. सीमेवर जोरदार गोळीबार झाला. जमिनीवर आणि हवाई क्षेत्रात पाकिस्तानकडून सतत घुसखोरी केल्यामुळे त्यांनी पाकिस्तानच्या ५८ सैनिकांना ठार मारल्याचं अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने दावा केला की, सीमेवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्यांचे २३ सैनिक मारले गेले तर २०० हून अधिक तालिबानशी संबंधित 'दहशतवादी' मारले गेले.

त्यानंतर सौदी अरेबियासह अनेक देशांनी दोन्ही बाजूंना संयम राखण्याचे आणि तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र आता अफगाणिस्तान आरपारचा निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचं दिसत आहे. आफगाणिस्तानने पाकिस्तानच्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना व्हिसा देण्यास नकार दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

मोठी बातमी! निवडणूक प्रचारादरम्यान NDAच्या महिला उमेदवारावर हल्ला,दगडफेकीत आमदाराचं डोकं फुटलं

India A Squad : वनडे संघात रोहित शर्मा, विराट कोहलीला स्थान नाही; इंडिया ए संघाची घोषणा, तिलक वर्मा कॅप्टन

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार

नेल एक्स्टेंशन करताना 'या' गोष्टींची अवश्य काळजी घ्यावी

SCROLL FOR NEXT