अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर अमेरिकेचा गोळीबार; लोकांची धावाधाव Twitter
देश विदेश

अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर अमेरिकेचा गोळीबार; लोकांची धावाधाव

अफगाणिस्तानमध्ये (Taliban at Afganistan) तालिबानने संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे.

वृत्तसंस्था

अफगाणिस्तानमध्ये (Taliban at Afganistan) तालिबानने संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे हजारो लोकांनी काबूल (Kabul Airport) सोडून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पायपीट सुरू केली आहे. एएफपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी काबूल विमानतळावर हजारो लोकांनी गोंधळ केला. त्यानंतर अमेरिकी सैन्याने (USA Army) जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, चेतावणी देण्यासाठी ते हवेत गोळ्या झाडत असल्याचे पाहून त्याला खूप वाईट वाटले.

विशेष म्हणजे रविवारी काबूल ताब्यात घेतल्यामुळे आता संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या अधिपत्याखाली आला आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी शेजारच्या ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्याच वेळी, तालिबानच्या सशस्त्र सदस्यांनी राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतल्याचे चित्रही समोर आले. अश्रफ घनी सरकारने कबूल केले की २० वर्षे चाललेल्या या लढ्यात तालीबान विजयी झाला.

सोमवारी सकाळीही हजारो लोक काबूलच्या दिशेने निघाले होते. एका वाहनातील 20-25 लोक बसून सुरक्षीत स्थळी पोहोचण्यासाठी प्रयत्न करत होते. काबूल विमानतळावरही मोठी गर्दी झाली होती आणि विमानतळ अधिकारी लोकांना बाहेर जाण्यासाठी विनंती करत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेने तालिबानला ताकीद दिली आहे की, रस्ते, विमानतळ आणि सीमा प्रवेशद्वारांबाहेर जाणाऱ्या लोकांना कोणतेही नुकसान होऊ नये. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली 60 देशांनी याबाबत संयुक्त निवेदन जारी केले आहे.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह सर्व देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी विशेष उड्डाणे करणार आहेत. भारताने रविवारी एअर इंडियाच्या विमानाने काबूलमधून आपल्या सर्व नागरिकांना बाहेर काढले. अनेक लोकांनी मानवतावादी कारणास्तव अमेरिका आणि इतर आघाडीच्या सैन्य देशांना आश्रयाचे आवाहन केले आहे. त्याना भीती आहे की जर ते अफगाणिस्तानात राहिले तर परदेशी सैन्याच्या मदतीने तालिबान सदस्य त्यांना लक्ष्य करूण ठार करतील .

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT