भारतात मधुमेह आणि लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीये. आता कमी किमतीत सेमाग्लुटाइड इंजेक्शन उपलब्ध होऊ लागल्याने अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
मुख्य म्हणजे ओरिजनल औषधाचं पेटंट संपताच देशातील मोठ्या औषध कंपन्यांनी तातडीने पावलं उचलली. यामध्ये Sun Pharma, Zydus Lifesciences आणि Dr Reddy's Laboratories यांनी या औषधाची स्वतःची वर्जन मार्केटमध्ये आणली आहेत. याआधी Natco Pharma नेही असा पद्धतीचं एक प्रोडक्ट लाँच केलं होतं.
सन फार्माने दोन वेगवेगळ्या ब्रँड नावांनी ही इंजेक्शन्स बाजारात आणल्याची माहिती आहे. Noveltreat हे वजन नियंत्रणासाठी असून ते पाच वेगवेगळ्या डोस मध्ये उपलब्ध आहे. तर Sematrinity हे टाईप २ मधुमेह नियंत्रणात न येणाऱ्या रूग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. Noveltreat चा दर आठवड्याला खर्च साधारण 900 ते 2,000 रुपयांपर्यंत आहे. तर Sematrinity साठी 750 ते 1,300 रुपये इतका खर्च येतो.
Zydus Lifesciences ने त्यांचं प्रोडक्ट मल्टी-डोस पेन डिव्हाइसच्या स्वरूपात आणलंय. SEMAGLYN, MASHEMA आणि ALTERME या नावांनी ते मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार या उपचारांसाठी महिन्याचा खर्च सुमारे 2,200 रुपये येणार आहे.
Zydus Lifesciences ने त्यांचं प्रोडक्ट मल्टी-डोस पेन डिव्हाइसच्या स्वरूपात आणलंय. SEMAGLYN, MASHEMA आणि ALTERME या नावांनी ते मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार या उपचारांसाठी महिन्याचा खर्च सुमारे 2,200 रुपये येणार आहे.
सेमाग्लुटाइड हे GLP 1 receptor agonists या औषधांच्या श्रेणीमध्ये येतं. ही औषधं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि वजन कमी करण्यासाठीही उपयोगी ठरतात. भारतात सध्या 10 कोटींपेक्षा जास्त लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. त्यामुळे या औषधांच्या पर्यायांमुळे जास्तीत जास्त रुग्णांना चांगले उपचार मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.