Gujarat News
Gujarat News saam tv
देश विदेश

माझे वडील, काका आणि भावांनी माझ्यावर... दत्तक घेतलेल्या मुलीने सांगितली आप बीती

Chandrakant Jagtap

Gujarat News: गुजरातच्या सुरतमध्ये एका १३ वर्षीय मुलीने आपल्या कुटुंबातील पाच जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे. अल्पवयीन मुलीने तिच्या दत्तक वडिलांसह तिचा भाऊ आणि इतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप (Crime News) केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात (Gujarat Crime) घेण्यात आले आहे.

सुरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलगी सुरतच्या अडाजन परिसरात राहते. तिने वडील, काका, दोन भाऊ आणि एका अल्पवयीन मुलावर बलात्काराचा आरोप केला आहे.

मुलीला 6 महिन्यांची असताना दत्तक घेतलं

पोलिसांनी सांगितले की, मुलगी 6 महिन्यांची असताना अनाथाश्रमातून एका कुटुंबाने तिला दत्तक घेतले होते. पीडितेने सांगितले की, जशी जशी ती मोठी होऊ लागली कुटुंबीयांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार करायला सुरुवात केली. अनेक दिवसांपासून आपल्यासोबत चुकीच्या गोष्टी घडत असल्याचा धक्कादायक खुलासा या पीडित तरुणीने केला आहे. पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गांभिर्याने घेतले आहे. (Crime News)

5 जणांविरोधात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल करताच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केली आहे. यातील 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान मुलीची वैद्यकीय चाचणी केली जाईल अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; जे. के. ऑर्किड इमारतीला भीषण आग

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

Today's Marathi News Live : उल्हासनगरमध्ये स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला लागली भीषण आग

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT