महिलांची NDA प्रवेश परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही- सर्वोच्च न्यायालय वृत्तसंस्था
देश विदेश

महिलांची NDA प्रवेश परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही- सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) च्या परीक्षांसाठी 14 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार आता महिलांनाही पुरुषांबरोबर नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये Women Admissions in NDA प्रवेश मिळणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता महिलांनाही सैन्यात प्रवेश मिळणार आहे. मात्र आता महिलांना NDA मध्ये नक्की कधी प्रवेश मिळणार यासंबंधीची माहिती केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टाला देण्यात आली होती. महिलांचा NDA प्रवेश पुढील वर्षीपासून सुरु करण्यात यावा असं केंद्र सरकारनं सुचवलं होतं. मात्र आता ही याचीक सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.

हे देखील पहा-

महिलांना प्रवेश देण्यासाठी काही पायाभूत आणि अभ्यासक्रमातील बदल काही आवश्यक आहेत. त्यामुळे महिलांना एनडीए प्रवेशासाठी सहभागी होण्यासाठी मे 2022 पर्यंत वेळ देण्यात यावा. यावर्षी महिलांना परीक्षा देण्यास खूप कमी वेळ होता. त्यामुळे अशी मागणी केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टाला करण्यात आली होती.

महिलांच्या प्रवेशाला स्थगिती देता येणार नाही असं न्यायमूर्तींनी म्हंटल आहे. याचिकाकर्ते कुश कालरा यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता चिन्मय प्रदिप शर्मा यांनी केलेल्या निवेदनाची खंडपीठानं दखल घेतली आणि त्यांनी म्हंटलं की, एनडीएकडून पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी वर्षातून दोन परीक्षा घेतल्या जात असतात. तर, महिलांना केवळ येत्या 2022 च्या परीक्षा देण्याची परवानगी का? म्हणजे परीक्षा देऊन निकाल आल्यावर त्यांचा एनडीएमध्ये प्रवेश थेट 2023 मध्येच होईल.

NDA मध्ये महिलांचा प्रवेश पुढे ढकलला जाणार नाही. आपत्कालीन परिस्थितीला Emergency Condition सामोरे जाण्यासाठी सशस्त्र दल चांगलं प्रशिक्षित आहे.

आज परीक्षा नाही, उद्या परीक्षा" हा दृष्टिकोन तरुण महिलांच्या आकांक्षांच्या विरोधात जाईल, असे न्यायालयाने म्हटले, 14 नोव्हेंबर रोजी परीक्षांसाठी अधिसूचना निर्देशित केली.

"जर ते मे २०२२ मध्ये परीक्षेत बसले तर जानेवारी २०२३ मध्ये हे सेवन होईल. आम्ही परीक्षांना आणि काही गोष्टींना एक वर्ष उशीर करू शकत नाही," असे न्यायमूर्ती एसके कौल आणि न्यायमूर्ती बीआर गवई म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT