Rahul Gandhi on Gautam Adani Saam Tv
देश विदेश

Coal Scam : अदानींचा कोळसा घोटाळा, सरकार आल्यास पै-पै चा हिशोब घेणार; राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

Adani Group लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे दोन टप्पे बाकी असतानाच काँग्रेस राहुल गांधींनी भाजप आणि अदानींवर मोठा कोळसा घोटाळ्याचा आरोप केल्यानं खळबळ माजलीय.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीसाठीच्या मतदानाचे दोन टप्पे बाकी असतानाच काँग्रेस राहुल गांधींनी भाजप आणि अदानींवर मोठा कोळसा घोटाळ्याचा आरोप केल्यानं खळबळ माजलीय. राहुल गांधींनी एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत आपल्या 'x' अकाऊंटवर ट्वीट करून भाजपच्या कार्यकाळातील कोळसा घोटाळा समोर आल्याचं म्हटलंय. एवढंच नव्हे तर सत्ता आल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करून पैसे वसूल करणार असल्याचा इशारा राहुल गांधींनी दिलाय.

अदानींवर कोळसा घोटाळ्याचे आरोप

भाजप सरकारचा मोठा कोळसा घोटाळा समोर आलाय. वर्षानुवर्षे चाललेल्या या घोटाळ्याच्या माध्यमातून मोदीजींचे प्रिय मित्र अदानींनी लो-ग्रेड कोळसा तीन पट दरानं विकून हजारो कोटी रुपयांची लूट केलीय. याची किंमत सामान्य जनतेला महागडी वीज विकत घेऊन आपल्या खिशातून मोजावी लागत आहे. या खुल्या भ्रष्टाचारावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स यांना शांत ठेवण्यासाठी किती टेंपो लागले हे पंतप्रधान सांगतील का? 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर सरकार या महाघोटाळ्याची चौकशी करून जनतेच्या लुटलेल्या पै-पैचा हिशोब करणार., असा इशाराच राहुल गांधींनी दिलाय.

युपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर कोळसा घोटाळ्याचे आरोप झाले होते. या आरोपांमुळे युपीए सरकारविरोधात जनतेच्या मनात नाराजीची लाट उसळली. त्यातूनच युपीएचं सरकार कोसळलं.

त्यानंतर मोदी सरकारच्या कार्यकाळात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डॉ. मनमोहन सिंह यांना क्लीन चीट दिली. मात्र आता राहुल गांधींनी फायनान्शियल टाईम्सच्या बातमीचा संदर्भ देत भाजप आणि अदानींवर गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्याबाबत नेमके आरोप काय आहेत? जाणून घेऊ..

अदानींवर काय आहेत आरोप?

1) अदानी समुहाने तामिळनाडूच्या जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन या सरकारी कंपनीसोबत व्यवहार करून कमी दर्जाच्या कोळशाची किंमत वाढवून घेतली.

2) कमी दर्जाचा कोळसा वापरून वीज निर्माण करणे म्हणजे जास्त इंधन जाळणे. यातून अदानींना मोठा नफा मिळाला.

3) कमी कॅलरी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या इंडोनेशियातून कमी किमतीत कोळसा मिळवला.

अदानी समुहाचं स्पष्टीकरण

फायनान्शियल टाईम्सचा रिपोर्ट आणि राहुल गांधींनी केलेले आरोप अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी फेटाळून लावले आहेत. ''कोळशाच्या गुणवत्तेची स्वतंत्रपणे लोडिंग आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह टांगेडको शास्त्रज्ञांनी चाचणी केली होती. अनेक एजन्सींकडून कोळशाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते. त्यामुळे कमी दर्जाच्या कोळशाच्या पुरवठ्याचा आरोप निराधार आणि अयोग्य आहे'', असं म्हणत अदानी समुहाने स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, 2012 मध्ये कोळसा खाण घोटाळा झाल्याचा आरोपाचा फटका तत्कालिन युपीए सरकारला बसला होता. मात्र आता मतदानाचे अवघे दोन टप्पे बाकी असताना राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे त्याचा भाजपला किती फटका बसणार? याचा निकाल 4 जूनलाच लागमार....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : अंगावर काटा आणणारी घटना! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Chief Minister Salary : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT