Adani Group News: Hindenburg's reaction after Adani Group reacted on Report saam tv
देश विदेश

Adani Group News: 'राष्ट्रवादाआड फसवणूक झाकली जाऊ शकत नाही', अदानींच्या स्पष्टीकरणानंतर हिंडेनबर्गची प्रतिक्रिया

Adani Group News: हिंडेनबर्ग रिसर्चवर योग्य संशोधन न केल्याचा आरोप समूहाकडून करण्यात आला. यानंतर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Chandrakant Jagtap

Adani Group News: हिंडेनबर्गच्या रिपोर्टवर अदानी समुहाने प्रतिक्रिया दिली आहे. या रिपोर्टमध्ये करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आणि भ्रमिष्ट असल्याचे म्हटले अदानी समुहाने (Adani Group) म्हटले. तसेच हिंडेनबर्ग रिसर्चवर योग्य संशोधन न केल्याचा आरोप समूहाकडून करण्यात आला. यानंतर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाचे आरोप फेटाळून लावले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांना उत्तर म्हणून अदानी समूहाने रविवारी 413 पानांचे 'स्पष्टीकरण' जारी केले आहे.

अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन संस्था हिंडेनबर्ग (Hindenburg) रिसर्चने त्यांच्या अहवालात म्हटले की, भारत एक जीवंत लोकशाही आणि उदयोन्मुख महासत्ता आहे आणि अदानी समूह 'पद्धतशीर लूट' करून भारताचे भविष्य रोखत आहे. हिंडेनबर्गने अदानी समूहावर फेरफार आणि अनियमिततांचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च आपल्या अहवालावर ठाम

अदानी समुहाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही हिंडेनबर्ग रिसर्च त्याच्या अहवालावर आहे. हिंडेनबर्गने या अहवालात म्हटले की, दोन वर्षांच्या तपासात अदानी समूह अनेक दशकांपासून शेअर्समध्ये फेरफार आणि खात्यांमध्ये हेराफेरी करत असल्याचे समोर आले आहे.

अदानी समुहाने हिंडेनबर्गवर केले आरोप

अदानी समूहाने रविवारी संध्याकाळी या आरोपांना उत्तर देताना हिंडेनबर्गवर आरोप केले आहे. हिंडेनबर्गने हा भारतावर जाणीवपूर्वक केलेला हल्ला होता. हे आरोप 'खोटे' आणि निराधार असल्याचे समुहाने म्हटले आहे. शेअर्सच्या किमती खाली आणून अमेरिकन कंपन्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी हा अहवाल कृत्रिम बाजार निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे अदानी समूहाने म्हटले होते. हा अहवाल चुकीच्या तथ्यांवर आधारित चुकीच्या हेतूने जारी करण्यात आला आहे असेही आदानी समुहाने म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT