Ishita Shukla Ravi Kishan Daughter saam tv
देश विदेश

Ishita Shukla Joins Indian Army: जिंकलंस! अभिनेता रवी किशनची मुलगी इशिता झाली 'अग्नीवीर', देशसेवा करणार

Ravi Kishan Daughter Ishita Shukla News: केंद्रातील मोदी सरकारनं अग्निपथ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी संरक्षण दलात सेवा करण्याची संधी देण्यात येते.

Chandrakant Jagtap

Ishita Shukla Ravi Kishan Daughter Joins Indian Army: अभिनेते आणि भाजप नेते रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला भारतीय लष्करात भरती झाली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत इशिता संरक्षण दलात रूजू होणार आहे. ती देश सेवेसाठी सज्ज झाली आहे.

केंद्रातील मोदी सरकारनं अग्निपथ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी संरक्षण दलात सेवा करण्याची संधी देण्यात येते.

रवी किशन यांनी सोशल मीडिया अकाउंटवर ही आनंदाची बातमी शेअर केली. इशिता केवळ २१ वर्षांची आहे. रवी किशन यांनी मुलगी इशिता ही दिल्ली संचालनालयाच्या '७ गर्ल बटालियन'ची कॅडेट आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

नेटकऱ्यांनी मात्र इशिताच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका स्टारची मुलगी असूनही स्वत:साठी वेगळा करिअरचा मार्ग निवडल्याबद्दल नेटकऱ्यांनी इशिताचे कौतुक केले आहे. "देवाचे आभार, काही अभिनेत्यांच्या मुलांनी अभिनय किंवा चित्रपट क्षेत्रात करिअर केले नाही. तिला शुभेच्छा. आर माधवनचा मुलगाही खूप हुशार आहे, तसाच माधुरीचा मुलगाही हुशार आहे", अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली. (Marathi Tajya Batmya)

"मला वाटतं हा पहिला राजकारणी, ज्याची मुलगी संरक्षण दलात सहभागी होऊन देशाची सेवा करेल. भारत बदलत आहे," असं अन्य एका यूजरनं म्हटलंय. "राजकारण्यांच्या मुलांना पहिल्यांदाच डिफेन्समध्ये जाताना पाहून आनंद होत आहे", असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे. (Latest Political News)

इशिता शुक्लाव्यतिरिक्त रवी किशनला तीन मुले आहेत. रिवा, तनिष्क आणि सक्षम अशी त्यांची नावे आहेत. रिवाला वडिलांप्रमाणेच अभिनयात करिअर करायचे आहे. तिने चित्रपट निर्मिती आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. उत्तम डान्स करणाऱ्या रिवाने अमेरिकेत अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. ती वर्षभर नसिरुद्दीन शाह यांच्या प्ले ग्रुपचा भाग होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT