Shivsena Political Crisis News : शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचं चिन्ह धनुष्य बाण कोणाचं या संदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाने शिवसेनेच्या घटनेत बेकायदेशीर बदल केला असा युक्तीवाद शिंदे गटाच्या वतीने निवडणूक आयोगात केला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)
१९६६ पासून शिवसेना पक्षावर ठाकरे घराण्याचं एक हाती वर्चस्व आहे. शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना. असं समीकरण महाराष्ट्राच्या गाव खेड्यापर्यंत पोहोचलं आहे. शिवसेनेच्या गेल्या 50 वर्षाच्या काळात शिवसेनेत अनेक राजकीय बंड झाले.
मात्र, 2023 ला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळं या समीकरणाला मोठा तडा केला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. 1989 मध्ये निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला मिळालेलं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण देखील हातातून जातंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिंदे गट आम्हीच खरी शिवसेना आहोत हे सातत्यानं सांगत आहेत. मात्र, शिवसेना पक्षाची घटना काय सांगते? निवडणूक आयोगात शिंदे गटाच्या लोक प्रतिनिधींचं पारडं जड आहे की ठाकरे गटाचं..
शिवसेना पक्षाची रचना.....
शिवसेना पक्षप्रमुख
शिवसेना नेते
शिवसेना उपनेते
शिवसेना सचिव
दोन्ही सभागृहाचे खासदार
दोन्ही सभागृहाचे आमदार
जिल्हा संपर्क प्रमुख
विभाग प्रमुख (मुंबई)
अशा एकूण 282 सदस्यांची प्रतिनिधी सभा आहे.
यातील 170 पेक्षा अधिक सदस्य ठाकरे गट त्यांच्यासोबत असल्याचा दावा करत आहे.
हे 282 प्रतिनिधी सदस्य त्यांच्यातील 14 सदस्यांची निवड कार्यकारणीवर नेते म्हणून करतात... या 14 सदस्यांना शिवसेना नेते पद दिलं जातं.. हे नेते त्यांच्यातील एका सदस्याची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करतात..
शिवसेना प्रमुख 5 सदस्यांची कार्यकारणीवर नियुक्ती करतात
2018 च्या प्रतिनिधी सभेनुसार शिवसेनेच्या नेते पदी 9 सदस्यांची निवड करण्यात आली आहे
1) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) (पक्ष प्रमुख)
2) आदित्य ठाकरे
3) मनोहर जोशी
4) लिलाधर डाके
5) सुभाष देसाई
6) दिवाकर रावते
7) रामदास कदम
8) संजय राऊत
9) गजानन किर्तीकर
यांची नेते पदी नियुक्ती केली आहे.
शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेते पदी नियुक्त केलेले सदस्य...
1) अनंत गिते
2) चंद्रकांत खैर
3) आनंदराव अडसूळ
4) एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
आनंदराव अडसूळ
गजानन किर्तीकर
रामदास कदम
हे सदस्य शिंदे गटाच्या बाजूने आहेत...
तर उर्वरीत कार्यकारणीचे सर्व सदस्य ठाकरे गटाच्या बाजूने असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. मात्र, निवडणूक आयोग फक्त कार्यकारणी सदस्य नाही तर लोकप्रतिनिधींच्या संख्येवर देखील भर देणार आहे. लोकांनी थेट जनतेतून निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा विचार केला तर शिंदे गटाचं पारडं जड आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.