Truck Collision Leaves Three Dead Many Injured Saam Tv News
देश विदेश

एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात! भरधाव ट्रकने लोकांना चिरडले; ३ जणांचा जागीच मृत्यू

Truck Collision Leaves Three Dead Many Injured: अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात. भरधाव ट्रकच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू.

Bhagyashree Kamble

सोमवारी सकाळी अहमदाबाद वडोदरा एक्स्प्रेसवेवेवर भीषण अपघात घडला. ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना आणि त्याजवळ उभ्या व्यक्तींना जोरदार धडक दिली. यामुळे भीषण अपघात घडला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाले. ही धक्कादायक घटना सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरटेक करताना एका चारचाकी वाहनाची दुसऱ्या वाहनाशी किरकोळ टक्कर झाली. यामुळे चारचाकी वाहन चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तसेच प्रवासी वाहनाबाहेर येऊन जवळच उभे राहिले. त्याचवेळी मागून आलेल्या एका वेगवान ट्रकने पार्क केलेल्या वाहनांना आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना धडक दिली.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात पाठवले. या भीषण अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 'चारचाकी वाहनाच्या किरकोळ टक्करनंतर प्रवासी आपापसात वाद घालत होते. दरम्यान, सुरतहून श्रीनगरकडे जाणारा ट्रक मागून आला आणि बसला धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.'

अपघाताची माहिती मिळताच रामोल पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात इतर चार ते पाच प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asthma: अस्थमाची लक्षणे कोणती? अशी घ्या काळजी

Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? चाहत्यांमध्ये खळबळ

Maharashtra Politics: कोकणात वर्चस्वासाठी राणे बंधूंमध्ये संघर्ष, थोपटले एकमेकांविरोधात दंड

Pramod Mahajan Case: प्रमोद महाजनांना का संपवलं? महाजनांच्या हत्येचा नवा अँगल समोर

SCROLL FOR NEXT