Uttarakhand Accident Twitter/@ANINewsUP
देश विदेश

Accident: लग्न सोहळ्यातून परतणारी कार दरीत कोसळली, 14 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

उत्तराखंडमधील टनकपूरच्या पंचमुख धर्मशाळा येथील लग्न सोहळा झाल्यानंतर परतत असताना कार दरीमध्ये कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे.

वृत्तसंस्था

उत्तराखंड: उत्तराखंडमधील टनकपूरच्या पंचमुख धर्मशाळा येथील लग्न सोहळा झाल्यानंतर परतत असताना कार दरीमध्ये कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हा अपघात झाला आहे. टनकपूर-चंपावत हायवेला जोडलेला सुखीढांग-डांडामीनार रोडवर झालेल्या मॅक्स गाडीच्या दुर्घटनेत प्रवास करणाऱ्या 16 जणांपैकी 14 जणांचा मृत्यू (Deaths) झाला आहे. तर वाहनचालक आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून जिल्हा रुग्णालयात (Hospital) त्यांना दाखल करण्यात आले आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्स गाडी (यूके 04, टीए- 4712) या मध्ये प्रवास करणारे सर्व लोक टनकपूरच्या पंचमुखी धर्मशाळामधील लग्न सोहळा आटपून घरी परतत होते. पण मध्यरात्री 3 वाजून 20 मिनिटांच्या आसपास गाडीवरचे नियंत्रण सूटले आणि गाडी थेट खोल दरीत जाऊन कोसळली. गाडीतील सर्व प्रवासी लग्नाला गेले होते. या दुर्घटनेमधील काही मृत व्यक्ती लक्ष्मण सिंह यांचे सख्खे नातेवाईक आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.

ताज्या माहितीनुसार, 14 मृत व्यक्तीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सध्या दुर्घटनेतील गंभीर जमखींवर रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. यामध्ये वाहन चालकाची प्रकृती अधिक गंभीर आहे. तसेच दुर्घटनेतील मृत व्यक्ती ककनईच्या डांडा आणि कठौती या गावातील रहिवासी आहेत. दरम्यान गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करत असल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT