Telangana ACB raids suspended DSP over disproportionate assets saam tv
देश विदेश

निलंबित DSPच्या घरात नोटांचं बंडल; ACB च्या ८ ठिकाणी धाडी, हाती आलं बेनामी संपत्तीचं घबाड

Anti Corruption Bureau DSP House: तेलंगणा एसीबीने निलंबित डीएसपीशी संबंधित आठ ठिकाणी छापे टाकले. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणात रोकड, कागदपत्रे आणि कथित बेनामी संपत्तीचा तपास सुरूय.

Bharat Jadhav

  • निलंबित डीएसपी भीम रेड्डी यांच्याशी संबंधित ठिकाणी तेलंगणा एसीबीची मोठी कारवाई.

  • उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याच्या प्रकरणात तपास सुरू.

  • डीएसपीशी संबंधित आठ संशयित बेनामीदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे.

तेलंगणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने निलंबित पोलीस उपअधीक्षकाच्या संबंधित ठिकाणावर टाकलेल्या धाडीत मोठं घबाड सापडलंय. संकीरेड्डी, भीम रेड्डी असे या निलंबित अधिकाऱ्याचे नाव आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. एसीबीनं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बेनामी संपत्ती जप्त करण्यात आलीय.

एसीबीच्या पथकांकडून पुप्पलागुडा आणि हैदराबादच्या इतर भागांतही शोधमोहीम राबवली जातेय. ही शोधमोहीम एसीबीचे डीएसपी गंगासानी श्रीधर यांच्या नेतृत्वात सुरू आहे. दरम्यान, छाप्यांचे फोटोही समोर आले आहेत. यात मोठ्या प्रमाणावर रोकड दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, भीम रेड्डी यांनी आपल्या ओळखीच्या व्यक्तींमार्फत बेनामी संपत्ती जमवलीय.

तपासादरम्यान एसीबीने भीम रेड्डी यांच्या ८ संशयित बेनामीदारांची ओळख पटवली. त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले जात आहेत. तेथून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दस्तऐवज जप्त करण्यात आलेत. एसीबीने यासंदर्भात 'प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट'नुसार गुन्हा दाखल केलाय. बेनामी मालमत्तेच्या मालकी हक्काचा आणि पैशांच्या व्यवहारांचा तपास केला जातोय. भीम रेड्डी यांनी आपल्या सेवाकाळात पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर संपत्ती जमवल्याचा आरोप आहे.

काही दिवसापूर्वी तेलंगणा एसीबीने निझाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक नोरी लक्ष्मी भास्कर यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला होता. एसीबीने त्यांच्या निवासस्थानासह आठ ठिकाणी धाडी टाकल्या. यात एजन्सीला अनेक फ्लॅट्स, मोकळे भूखंड, आलिशान गाड्या, सोन्याचे दागिने आणि कोट्यवधी रुपयांची आर्थिक गुंतवणूक आढळून आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT