मोठी बातमी! दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अन् खांदेपालट होणार; शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

Mahayuti Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांनी मोठं विधान केलंय. दिवाळीत किंवा दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
Maharashtra cabinet expansion after Diwali 2026 Bachchu Kadu statement
Maharashtra cabinet expansion after Diwali 2026 Bachchu Kadu statementsaam tv
Published On
Summary
  • दिवाळीत किंवा दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

  • मंत्रिमंडळ विस्तारासोबत खांदेपालट होण्याचे संकेत

  • मुख्यमंत्र्यांनी अडीच-अडीच वर्षांच्या वाटपाबाबत शब्द दिल्याचा दावा बच्चू कडूंनी केला

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चेनंतर आता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. मंत्रिमंडळ विस्तारासह महायुती सरकारमध्ये मोठी खांदेपालट सुद्धा होणार असल्याचं म्हटलं जातंय. शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी याबाबत गोप्यस्फोट केलाय. आमदार बच्चू कडू जळगाव दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा दावा केलाय. (Maharashtra cabinet expansion after Diwali 2026 Bachchu Kadu statement)

Maharashtra cabinet expansion after Diwali 2026 Bachchu Kadu statement
भाजपला निवडणुकीआधी मोठा धक्का; केंद्रातील मित्रपक्षानं सोडली साथ, दुसऱ्या पक्षाशी बांधली युतीची गाठ

बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्तार तसेच संभाव्य खांदेपालटाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. "दिवाळीत किंवा दिवाळीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि मोठा खांदेपालट होण्याची शक्यता बच्चू कडू यांनी वर्तवलीय. याचवेळी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द दिला होता अशी आठवणही त्यांनी करून दिली. मात्र बच्चू कडू यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द नेमक्या कोणत्या मुद्यासाठी होता? कोणत्या मंत्रिपदाच्या अनुषंगाने आहे, याबाबत चर्चा सुरू झालीय.

Maharashtra cabinet expansion after Diwali 2026 Bachchu Kadu statement
भाजपमध्ये पुन्हा फेरबदल! प्रभारींनंतर नवीन २४ सह-सरचिटणीस नियुक्त; महाराष्ट्राची धुरा कोणाकडे?

जळगाव दौऱ्यावर असलेल्या बच्चू कडू यांनी आमदार किशोर पाटील यांच्या मंत्रिपदाची मागणी केली. "जळगाव जिल्ह्यातून किशोर आप्पांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेच पाहिजे. हवे तर जिल्ह्यात दोन मंत्रिपदे ठेवा, पण आप्पांना मंत्री करा. किशोर पाटील हे सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारसंघातील जनतेला त्यांना मंत्रिपद मिळावे असे वाटणे अत्यंत स्वाभाविक असल्याचे बच्चू कडू म्हणालेत. किशोर पाटील यांच्या मंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जोर लावू असेही कडू यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com