देश विदेश

Telangana News : सरकारी अधिकऱ्याच्या घरात सापडला 'कुबेराचा खजिना'! ACBचे अधिकारी संपत्ती मोजून-मोजून थकले

ACB Raid On Government Officer : एस बालकृष्ण यांनी सरकारच्या विविध पदांवर काम केलं आहे. याआधी ते हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA) मध्ये नगर नियोजन संचालक म्हणून कार्यरत होते.

प्रविण वाकचौरे

Telangana News :

तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एका सरकारी अधिकाऱ्याकडून सुमारे 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तेलंगणा राज्य रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (TSRERA) चे सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी एस. बालकृष्ण यांच्या विविध जागांवर एकाच वेळी छापेमारी केली.

एस बालकृष्ण यांनी सरकारच्या विविध पदांवर काम केलं आहे. याआधी ते हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA) मध्ये नगर नियोजन संचालक म्हणून कार्यरत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवसभर 14 पथकांची शोधमोहीम

बुधवारी दिवसभर लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणेच्या 14 पथकांची शोधमोहीम सुरू होती आणि गुरुवारी पुन्हा सुरू ही शोधमोहीम सुरु होण्याची शक्यता आहे. बालकृष्ण यांच्या घरावर, कार्यालयांवर, त्यांच्या नातेवाईकांच्या जागेवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले, ज्यात 100 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली.  (Latest Marathi News)

आतापर्यंत सुमारे 40 लाख रुपये रोख, 2 किलो सोने, इतर मालमत्तांची कागदपत्रे, 60 महागडी घड्याळे, 14 मोबाइल फोन आणि 10 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्याचे बँक लॉकर्स अद्याप उघडलेले नाहीत. एसीबीने किमान चार बँकांमधील लॉकरची माहिती मिळवली आहे.

एसीबीच्या अधिकाऱ्यांना बालकृष्ण यांच्या निवासस्थानी नोटा मोजण्याचे यंत्र सापडले आहे. एचएमडीएमध्ये कार्यरत असताना त्यांनी ही संपत्ती गोळा केली असल्याचा संशय एसीबीला आहे. सध्या सुरू असलेल्या शोधमोहिमेत आणखी मालमत्ता सापडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

SCROLL FOR NEXT