Sanjay Raut Saam Tv
देश विदेश

Sanjay Raut on Bihar election: बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न, संजय राऊतांना वेगळाच संशय, पोस्ट व्हायरल

Bihar election: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतोय. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीएला स्पष्ट बहुमत मिळालेलं दिसतंय. अशातच संजय राऊतांनी भाजपला खोचक टोला लगावलाय.

Surabhi Jayashree Jagdish

  • बिहार निवडणुकीत एनडीए आघाडीवर आहे

  • काँग्रेस आघाडी मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहे

  • संजय राऊतांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली

आज बिहार निवडणुकीच्या निकालाचा दिवस अखेर उजाडला. या निकालाच्या दिवशी कैक राजकीय घडामोडींनी यामध्ये वेग धरल्याचं पाहायला मिळतंय. सध्या हाती असलेल्या निकालांनुसार, बिहारमध्ये नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए प्रचंड बहुमताने आघाडीवर आहे.

बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस आणि त्यांची आघाडी चांगलीच पिछाडीवर पडलीये. या निवडणूकीचे पडसाद महाराष्ट्रात देखील दिसून येतायत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ट्विट करून याबाबत प्रतिक्रिया दिलीये. बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न, असा टोला राऊतांनी विरोधकांना लगावलाय.

बिहारमध्ये महागठबंधनला सुरुवातीच्या कलांनुसार अजून ५० जागाही मिळालेल्या नाहीत. महाआघाडीच्या या अपयशावर संजय राऊत यांनी भाष्य केलंय.

ट्विटमध्ये काय म्हणाले संजय राऊत?

बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांच्या हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हतं!

एकदम महाराष्ट्र पॅटर्न!

जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना ५० च्या आत संपवलं!

लोकांनी दिल्या प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची तब्येत ठीक नसल्याचं समोर आलं होतं. बिहारच्या रिझल्टवर संजय राऊतांनी केलेल्या ट्विटवर नागरिकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये काहींनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं राऊतांना सांगितलंय. तर काहींना हा हिंदू एकतेचा विजय असल्याचं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamil Nadu Aircraft Crash : मोठी बातमी! भारतीय हवाई दलाचे विमान तामिळनाडूत कोसळलं

Maharashtra Live News Update: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धडक मोर्चा

Winter Skin Care Tips For Men: हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसतेय, पुरूषांनी फॉलो करा या सोप्या टिप्स

Accident News : ८ जणांचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी 'तिरडी' आंदोलन, नवले पुलावर पुणेकरांचा आक्रोश!

Face Care: सॉफ्ट आणि ग्लोईंग चेहऱ्यासाठी महागड्या ट्रिटमेंट घेताय? त्यापेक्षा ट्राय करा हा हॉममेड फेसपॅक, आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT