नवी दिल्ली : बालाकोट एअर स्ट्राईक मध्ये कौतुकास्पद कामगिरी करणारे भारतीय भारतीय हवाई (Indian Air Force) दलाचे विंग कमांडर (Wing Commander) अभिनंदन वर्धमान यांचं प्रमोशन झालं आहे. अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांना आता ग्रुप कॅप्टनची रँक मिळाली आहे.
अभिनंदन यांनी पाकिस्तानची F-16 फायटर विमान भारताच्या हवाई हद्दीत घुसली होती त्या विमानांना प्रत्युत्तर दिलं होत. ते जास्त चर्चेत आले ते म्हणजे त्यांना पाकिस्तानी सैन्याने मारहाण केलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाल्यावरती. देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च आणि आपल्या जीवावरती उदार होत अभिनंदन यांनी केलेल्या कामगिरीसाठी त्यांना याआधी शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
27 फेब्रुवारीला पाकिस्तानने 10 फायटर विमानांना भारतात पाठवलं होतं. त्या विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या मिग 21 या विमानाने उड्डाण घेतलं होतं यातील एका विमानाचे अभिनंदन पायलट होते. त्यांनी पाकिस्तानच्या विमानांना प्रत्युत्तर देत त्यांचं एक विमान पाडलं मात्र अभिनंदन यांचे भरकटलं आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत पडलं होतं अभिनंदन यांना पकडून पाकिस्तानी सैन्याने त्रास दिला होता. दरम्यान भारत सरकारने अभिनंदन यांना सुखरुप रित्या परत आणलं.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.