मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने भारत बायोटेकने तयार केलेल्या Covaxin लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. अनेक दिवसांपासून कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी WHO परवानगी देणार की नाही आणि कधी देणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा चालू होती मात्र अखेर या लसीला WHO ने मान्यता दिली आहे.
भारतात निर्मिती होणाऱ्या कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेनं कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली असली तरी भारतात मात्र या लसीचे डोस देण्याची सुरुवात याआधीच झाली आहे. भारत सरकारने (Government of India) कोवॅक्सिनला मागेच मान्यता दिली आहे.
हे देखील पहा -
तरीही देशाबाहेर या लसीचा Vaccine वापर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची आवश्यकता गरजेची होती आणि आज अखेर ती मिळाल्याने ती आता सर्व जगभरात वितरीत केली जाऊ शकते आणि ग्राह्य देखील धरली जाणार आहे. कारण या आधी भारतातून परदेशात जाणाऱ्यांना या लसीचे दोन्ही डोस घेतले तरी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. WHO च्या मान्यता नसल्याने अनेक देशांनी या लसीचे डोस घेतलेल्या भारतीयांना बाहेरच्या देशात प्रवेश नाकारला होता. दरम्यान ही लस 78% प्रभावी असल्यातीह WHO ने स्पष्ट केलं आहे याबाबत त्यांनी ट्विटद्वारे Tweet माहिती दिली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.