Abhijit Dipke Latest Marathi News : जंतर-मंतरवर NEET परीक्षा घोटाळ्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांकडून कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप CJP संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे. त्यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दगडांनी भरलेला ट्रक कशासाठी?
अभिजित दीपके यांनी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले, जंतर-मंतरवर अचानक दगडांनी भरलेला ट्रक आणून उभा करण्यात आला आहे. पोलीस आणि प्रशासन नक्की कसली तयारी करत आहेत? शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरच दगडफेकीचा आरोप लावण्यासाठी हा कट रचला जात आहे का?
तोडफोड झालेली व्हॅन उभी करून षड्यंत्र?
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दीपकेंनी आंदोलनाच्या ठिकाणी उभी असलेली एक तुटलेली आणि नुकसान झालेली व्हॅन दाखवली आहे. हा व्हिडिओ एक्सवर शेअर केलाय. ते म्हणाले की, दिल्ली पोलिसांना खरोखर लाज वाटली पाहिजे. जंतर-मंतरवर आधीच दगडांनी भरलेला ट्रक आणि तोडफोड झालेली व्हॅन आणून ठेवली आहे. आमचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आहे, पण आंदोलकांनीच ही तोडफोड केली असा खोटा बनाव रचून आंदोलनाला बदनाम करण्याचा हा पोलिसांचा प्रयत्न आहे.
नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले आहे. सीजेपीचे (CJP) अध्यक्ष अभिजित दीपके यांनी दिल्ली पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संसदेवर काढण्यात येणाऱ्या मार्चपूर्वी पोलिसांनी आंदोलकांना नाहक त्रास दिल्याचा आणि त्यांची दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा दीपके यांनी केला. "आम्ही शांततेच्या मार्गाने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारांसाठी लढत आहोत, पण पोलीस आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक देत आहेत," असा थेट आरोप अभिजित दीपके यांनी केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली असून, कितीही अडथळे आणले तरी विद्यार्थ्यांचा हा लढा मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.