Up News Saam Tv
देश विदेश

UP: आझम खान, मुलगा अब्दुल्ला आणि पत्नीला ७ वर्षांची शिक्षा: रामपूर कोर्टाचा निर्णय

UP News : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुला आझम यांच्या दोन जन्म प्रमाणपत्र प्रकरणी न्यायालायने निर्णय दिलाय.

Bharat Jadhav

Azam Khan UP News:

समाजवादी पक्षाचे माजी आमदार अब्दुला आझम यांच्या दोन जन्म प्रमाणपत्र प्रकरणी आजम खान आणि त्यांची पत्नी तजीन फातमा यांना दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने आझम खान, अब्दुला आझम, आणि पत्नी तंजीन फातमा यांना ७ वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावलीय. न्यायालयाने तिघांना दोषी ठरवलं असून या तिघांची रवानगी तुरुंगात होणार आहे. समाजवादी पक्षाचे माजी आमदार अब्दुला आझम खान यांच्या दोन जन्म प्रमाणपत्र प्रकरणात दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बुधवारी आपला निर्णय दिला. (Latest News)

२०१९ मध्ये भाजप आमदार आणि लघु उद्योग सेलचे तत्कालीन प्रादेशिक समन्वयक आकाश सक्सेना यांनी आझम खान यांच्या मुलाविरुद्धात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम याचे दोन जन्म प्रमाणपत्र असल्याप्रकरणी होती. या तक्रारीमध्ये सक्सेना यांनी आझम खान आणि त्यांची पत्नी डॉ. तंजीन फातमा यांनादेखील आरोपी म्हटलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तपासाअंती पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात या तिघांविरुद्धात दोषारोपपत्र दाखल केले. हे तिघेही सध्या जामिनावर बाहेर आहेत. हा खटला एमपी-एमएलए सत्र ट्रायल कोर्टात सुरू आहे. या प्रकरणी अब्दुल्ला आझम यांचे वकील ११ ऑक्टोबर रोजी युक्तिवाद करणार होते. परंतु त्यांच्याकडून कोर्टात स्थगिती अर्ज देण्यात आला, त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अब्दुल्ला यांना १६ ऑक्टोबरपर्यंत लेखी युक्तिवाद करण्याचे आदेश दिले.

या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायाधीश न्यायालयात रिव्हिजन दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी केल्यानंतर एमपी-एमएलए सत्र न्यायालयात हे फेटाळून लावले. मंगळवारी अब्दुला आझम यांच्या वकिलांनी न्यायालयात लेखी युक्तिवाद दाखल केला. यानंतर न्यायालयात दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आणि न्यायालयाने हा निकाल दिला.

३० साक्षीदार आणि कागदपत्रांच्या आधारावर दिला निर्णय

समाजवादी पक्षाचे माजी आमदार अब्दुला आझम यांचे दोन जन्म प्रमाणपत्र प्रकरणी न्यायालयाने ३० साक्षीदार आणि उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्याचा आधार घेत हा निर्णय दिला. दोन्ही बाजूकडे १५-१५ साक्षीदार हजर करण्यात आले. माजी आमदार अब्दुला आझम खान यांचे दोन जन्म प्रमाणपत्र असल्याचं प्रकरण २०१९मध्ये समोर आलं होतं. त्यावेळी भाजपचे लघु उद्योग सेलचे तत्कालीन प्रादेशिक समन्वयक आकाश सक्सेना यांनी गंज पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात तक्रार दाखल केली होती.

अब्दुला आझम यांनी आपले दोन जन्म प्रमाणपत्र बनवले आहेत. यातील एक जन्म प्रमाणपत्र हे रामपूर नगरपालिका परिषदेतील आहे. तर दुसरे प्रमाणपत्र हे लखनौ नगरपरिषदेतील आहे. या जन्म प्रमाणपत्राचा उपयोग अब्दुला आझम यांनी विधानसभा निवडणुकीसाठी केला. याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात चार्जशी दाखल केली. या खटल्यातील फिर्यादी आमदार आकाश सक्सेना यांच्यासह १५ साक्षीदारांचे जबाब फिर्यादीच्या वतीने न्यायालयात नोंदवण्यात आले. तर अब्दुल्ला आझम, आझम खान आणि डॉ. तंजीन फातमा यांनी त्यांच्या बचावात १५ साक्षीदारांचे जबाब घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :जामनेर मध्ये मतमोजणी थांबवली

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT