Delhi Loksabha Election Google
देश विदेश

Delhi Politics : दिल्लीत 'इंडिया'च्या सीट शेअरिंगचं ठरलं! काँग्रेसला पूर्वेऐवजी उत्तर पश्चिमची जागा देणार 'आप'

Delhi Lok Sabha Election: दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेली वाटाघाटी आज संपली. जागावाटपावर निर्णय झाला असून आम आदमी पार्टी ४ जागांवर तर काँग्रेस ३ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. एका जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाली होती मात्र चर्चेतून हाही वाट मिटलाय.

Bharat Jadhav

Congress And AAP Seat Sharing For Lok Sabha Election In Delhi :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरूय. दिल्लीतील लोकसभेच्या जागांसाठी आप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू होता. आज आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला असून काँग्रेस ३ जागांवर निवडणूक लढवण्या तयार झालीय. तर ४ जागांवर आम आदमी पक्ष आपले उमेदवार देणार आहे. दरम्यान एका जागेवरून दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता, तो वादही आज चर्चेअंती सुटलाय. (Latest News)

दिल्लीतील आप-काँग्रेस युतीबाबत उत्तर पश्चिम जागेवरून दोन्ही पक्षांमधील चर्चा रखडली होती. परंतु दोन्ही पक्षांनी समजदारीने यावर तोडगात काढत जागा वाटपाबाबतची वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण केली. ही जागा काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. त्याऐवजी आम आदमी पक्ष पूर्व दिल्लीतून आपला उमेदवार उभा करणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याआधी आम आदमी पक्षाला उत्तर पश्चिम जागेवर आपला उमेदवार उभा करायचा होता, पण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना ही राखीव जागा त्यांच्या खात्यात हवी होती. दरम्यान दोन्ही पक्षाच्या वाटाघाटीनंतर काँग्रेस दिल्ली लोकसभेसाठी (Lok Sabha) चांदनी चौक, उत्तर पश्चिम आणि ईशान्य दिल्ली या तीन जागेवर उमेदवार देणार आहे. तर नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि पूर्व दिल्ली या ४ जागांवर आम आदमी पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे.

गुजरातमधील जागा वाटपाबाबत उद्या घोषणा होण्याची शक्यता

गुजरातमध्ये काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पार्टी (Aam Adami Party) यांच्यातील युतीबाबतची चर्चाही अंतिम टप्प्यात आहे. याबाबत शुक्रवारी घोषणा होणार असल्याची चर्चा होती, मात्र आता शनिवारी जागा वाटपाची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मिळालीय. मात्र एका जागेबाबत संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. गुजरातच्या भरुच जागेवर काँग्रेस आणि आपचे उमेदवार दावा करत आहेत. काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे समर्थक या जागेसाठी दावा करत आहेत. तर या आदिवासी बहुल भागात आम आदमी पक्ष आदिवासी आमदार चैत्रा वसावा यांना संधी देण्याच्या तयारीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT