Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

India Alliance News: 'आप पंजाबच्या सर्व 13 लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार', INDIA आघाडीच्या बैठकीपूर्वी केजरीवालांचे मोठे वक्तव्य

Satish Kengar

AAP will contest all 13 Lok Sabha seats of Punjab, Arvind Keriwal's announcement:

आम आदमी पार्टीचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीपूर्वीच एक मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांचं टेन्शन वाढलं आहे. पंजाबमधील भटिंडा येथील सभेत अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील सर्व 13 लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.

या घोषणेने केजरीवाल यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला थेट संदेश दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि आपमधील वाद पुन्हा एकदा वाढू शकतो, अशी चर्चा आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंजाबमधून लोकसभेच्या 13 जागा येतात. या राज्यात काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात थेट लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने राज्यात काँग्रेसचा पराभव करत प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले होते. आता पक्षाला याच आधारावर लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवायची आहे, जी काँग्रेसला मान्य नाही. यातच मोठी गोष्ट म्हणजे इंडिया आघाडीची पुढील बैठक 19 डिसेंबरला दिल्लीत होणार आहे. (Latest Marathi News)

केजरीवाल यांनी काँग्रेसवर साधला निशाणा

पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचाराचा संदर्भ देत त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, या लोकांनी इतका भ्रष्टाचार केला आहे की, 10 रुपयांची वस्तू 100 रुपयांना विकल्या. पण, आज 10 रुपयांची वस्तू 8 रुपयांना मिळते. वीज बिल शून्य झाले आहे.

आता पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या घोषणेने काँग्रेसमध्ये ताण वाढला आहे. दिल्लीतही पक्ष काँग्रेसला जास्त जागा देण्यास तयार नाही. त्याचबरोबर काँग्रेसनेही सर्व 7 जागांवर निवडणूक लढवण्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत दिल्ली आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या वादामुळे इंडिया आघाडीच्या अडचणी वाढत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

SCROLL FOR NEXT