मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेली डेडलाईन जवळ येत असताना सरकार आणि आंदोलक या दोघांच्याही हालचालींना वेग आलाय. २४ डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटीमध्ये राज्यव्यापी बैठक घेण्यात आली. सरकारने २४ डिसेंबरपर्यंत आश्वासन पाळले नाही तर, मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.
या बैठकीला राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव पोहचले होते. यावेळी २४ नंतरच्या आंदोलनाची घोषणा झाली नसली तरी, आरक्षण मिळाले नाही तर, दिल्लीत जसं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं, त्याच धर्तीवर आंदोलन करण्याचे संकेत बैठकीत मिळाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या आंदोलनाची पक्की तयारी करू, एकदा धडक द्यायची ठरली की ठरली तीही नियोजनबद्ध. त्यासाठी शेतातील कामे उरकून घ्या. जायचं ठरलं तेव्हा सर्व तयारीनिशी निघायचंय. एकदा निर्णय घेतला की घेतल्याशिवाय माघार नाही, असं जरांगे म्हणाले आहेत. (Latest Marathi News)
एकीकडे ही बैठक तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी शिंदे समिती सोबत तातडीची बैठक बोलावून आत्तापर्यंतचा आढावा घेतला. उद्या मुख्यमंत्री स्वतः हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आणि कुणबीबाबत काय काय नेमकं काम केलं आणि त्यांची भूमिका काय आहे, याबाबत निवेदन करणार आहेत. त्यामुळे सरकारी पातळीवर मराठा आरक्षणाबाबत आणि कुणबीबाबत सरकार सकारात्मक असल्याचं दिसून येतय. खुद्द मुख्यमंत्री आणि सरकारचे शिष्टमंडळ काल जरांगे यांना याबाबत सांगितले.
दरम्यान, मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दोनवेळा उपोषण करून आंदोलनाची धार तीव्र केली आहे. त्यावर राज्यातला मराठा एकवटत चालला आहे. त्यामुळे सरकारलाही आता सकारात्मक निर्णय घ्यावे लागतील अशी स्थिती आहे. कारण या आंदोलनाची धग वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलन आणि आरक्षणाबाबत सरकारचे कार्य गतिमान झालय, असं चित्र सध्या तरी दिसतंय. जर यात डेडलाईन हुकली तर महाराष्ट्रात सरकार आणि आंदोलक या दोन्ही पातळीवरची स्थिती काय असेल हे चोवीस तारीख उलटल्यानंतर कळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.