Atishi Marlena Saam Tv
देश विदेश

Atishi Marlena: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण भाजपचं षडयंत्र; आप नेत्या आतिशींचा गंभीर आरोप

Atishi Claim On BJP Over Swati Maliwal Case: आपच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात आप नेत्या अतिशी मार्लेना यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा भाजपच्या मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप साम टीव्ही, नवी दिल्ली

आपच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात आप नेत्या अतिशी मार्लेना यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा भाजपच्या मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

ईडी, सीबीआय, भ्रष्टाचारविरोधी ब्युरो, आयकर विभाग, आर्थिक गुन्हे शाखेचा वापर विरोधी नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि त्यांना भाजपमध्ये सामील करण्यासाठी केला गेला. त्याचप्रमाणे स्वाती मालीवाल प्रकरणात देखील तेच सूत्र वापरलं गेलं आहे. स्वाती मालीवाल यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. याचा वापर करून स्वाती मालीवाल यांचा हा कट रचण्यात आला. त्यांना मोहरा म्हणून वापर करण्यात आला. कोण कोणाच्या संपर्कात होते याचा तपास करा, असं आतिशी (Atishi Marlena) यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

त्या म्हणाल्या की, काल स्वाती मालीवाल (Swati Maliwal Assult Case) यांचा एक व्हिडिओ समोर आला. तो संपूर्ण देशाने पाहिला आहे. या व्हिडिओत त्यांना कुठेही जखम झालेली, त्यांचे कपडे फाटलेले दिसत नाहीत. तक्रारीत नमूद केलेले सर्व आरोप खोटे आहेत, ते त्या व्हिडिओवरून स्पष्ट होत असल्याचं आतिशी यांनी म्हटलं आहे.

स्वाती मालीवाल या विभव कुमार यांच्यावर आरोप करत आहेत. कालच्या व्हिडिओने त्यांच्या खोटं बोलण्याचा पर्दाफाश केला आहे. आज पुन्हा एक सीसीटीव्ही समोर आलाय. त्यात त्या स्पष्ट चालताना दिसत आहेत. बाहेर जाऊन त्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकावत असल्याचा गंभीर आरोप आतिशींनी केला आहे. हा एक भाजपने (CM Arvind Kejariwal) रचलेल्या मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा खळबळजनक दावा देखील त्यांनी केला आहे.

भाजप तपास यंत्रणांमार्फत आरोप करून विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेतात. स्वाती मालीवाल यांच्यावर भाजपने दिल्ली महिला आयोगात असताना केलेल्या अनैतिक भरती प्रकरणी केस केली (Atishi Marlena Claim On BJP) होती. त्यावर चार्जशीट फाईल झाली होती. त्यामुळे स्वाती मालीवाल असे आरोप करत आहेत, हा भाजपचा जुना फॉर्म्युला असल्याचं मालीवाल यांनी म्हटलं आहे.

हे षडयंत्र स्थानिक पोलिसांकडून नाही तर गृहमंत्रालयातून सुरू असल्याचं आतिशींनी म्हटलं आहे. विभव कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केलेली नाही. पोलीस असं का करत आहेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करण्यासाठी हा प्लॅन केला असल्याचं म्हटलं आहे. भाजपने रचलेला हा मोठा प्लॅन आहे, हे सिद्ध झालं असं आतिशींनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT